उद्या लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा, या शहरातील बँका राहणार बंद, संपूर्ण यादी एका क्लिकवर
उद्या (13 मे 2024) देशात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक शहरांमध्ये बँका (Bank) बंद राहणार आहेत.
Bank Holiday For Election: सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) रणसंग्राम सुरु आहे. आत्तापर्यंत तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उद्या (13 मे 2024) देशात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक शहरांमध्ये बँका (Bank) बंद राहणार आहेत. त्यामुळं बँकांचे व्यवहार करणाऱ्यांनी संपूर्ण यादी पाहावी आणि मगत घराच्या बाहेर पडावे.
तुम्हाला जर बँकेशी संबंधीत काही कामे करायची असतील तर ही यादी तपासा आणि मगच घराच्या बाहेर पडा. कारण उद्या अनेक शहरातील बँका बंद राहणार आहेत. उद्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर काही शहरातील बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे.
'या' ठिकाणी बँका राहणार बंद
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या यादीनुसार हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), कानपूर आणि श्रीनगरमध्ये उद्या मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत या शहरांमध्ये सोमवारी बँकांना सुट्टी असणार आहे. इतर ठिकाणच्या बँका मात्र सुरळीत सुरु राहतील.
चौथ्या टप्प्यात किती ठिकाणी होणार मतदान?
उद्या देशात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यात देशात 96 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये तेलंगणामध्ये 17, आंध्र प्रदेश 25, उत्तर प्रदेश 13, बिहार पाच, झारखंडच्या चार, मध्य प्रदेशच्या आठ, महाराष्ट्राच्या 11, ओडिशाच्या चार आणि पश्चिम बंगालच्या आठ आणि जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये एका लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे.
मे महिन्यातही या दिवशी बँका राहणार बंद
16 मे 2024- गंगटोकमध्ये राज्य दिनानिमित्त बँका बंद राहतील.
19 मे 2024- रविवारमुळे संपूर्ण देशात सुट्टी असेल.
20 मे 2024- लोकसभा निवडणुकीमुळे बेलापूर, मुंबई येथे बँका बंद राहतील.
23 मे 2024- बुद्ध पौर्णिमेमुळे आगरतळा, ऐझॉल, बेलारपूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, इटानगर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील. .
25 मे 2024- चौथ्या शनिवारमुळे बँका बंद राहतील.
26 मे 2024- रविवारमुळे बँका बंद राहतील.
महत्वाच्या बातम्या: