Shani Gochar 2025 : 29 मार्चपासून 'या' 2 राशींची होणार चांदी; शनीच्या ढैय्यापासून मिळणार मुक्ती, रखडलेली कामे होतील पूर्ण
Shani Gochar 2025 : या ठिकाणी दोन राशी अशा आहेत ज्यांना शनीच्या ढैय्यापासून मुक्ती मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीला शनीच्या (Lord Shani) ढैय्या, महादशा आणि साडेसातीचा सामना करावा लागतो. माहितीनुसार, शनीच्या ढैय्याचा काळ हा अडीच वर्षांचा असतो. तसेच, शनीला एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे या ठिकाणी दोन राशी अशा आहेत ज्यांना शनीच्या ढैय्यापासून मुक्ती मिळणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
या राशींना ढैय्यापासून मिळणार मुक्ती
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
शनीच्या राशी संक्रमणाने वृश्चिक राशीच्या लोकांना शनीच्या ढैय्यापासून मुक्ती मिळणार आहे. या दरम्यान शनिदेवाच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात सुख, शांती टिकून राहील. तसेच, सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल. तसेच, मुलांची शिक्षणात चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, या राशीच्या लोकांचे धार्मिक यात्रेला जाण्याचे देखील योग जुळून येणार आहेत.
या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, कोर्ट कचेरीच्या संदर्भातील सर्व प्रक्रिया लवकर पूर्ण होईल. या काळात तुमचं मन धार्मिक कार्यात गुंतेल. इतकंच नव्हे तर तुम्हाला आर्थिक लाभदेखील मिळू शकतो.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी शनीच्या राशी संक्रमणाचा काळ फार शुभकारक असणार आहे. त्यामुळे बारा राशींपैकी कर्क राशीच्या लोकांना याचा चांगलाच लाभ घेता येणार आहे. या काळात तुम्हाला धार्मिक यात्रेला जाण्याचा अनुभव घेता येईल. तसेच, समाजात तुमचा चांगला मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल. तसेच, या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. एकूणच तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल.
शनीच्या राशी संक्रमणाच्या काळात कोणाशीही वाद घालण्याचा प्रयत्न करु नका. तसेच, आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्हाला शनीच्या कृपेचा लाभ घेता येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Astrology : आज सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कर्कसह 5 राशींचं नशीब उजळणार, मार्गातील अडथळे होतील दूर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
