Astrology : आज सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कर्कसह 5 राशींचं नशीब उजळणार, मार्गातील अडथळे होतील दूर
Astrology Panchang Yog 21 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 21 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 21 मार्चचा दिवस. आज चैत्र शुक्ल सप्तमी तिथी आहे. तसेच, आजच्या दिवशी गजकेसरी योगाचा (Yog) शुभ संयोग जुळून येणार आहे. तसेच, आज मीन राशीत मालव्य राजयोग जुळून आला आहे. या दरम्यान सिद्धी योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस 5 राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. या 5 राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद दिसून येईल. सामाजिक कार्यात तुमचा साम-सन्मान दिसून येईल. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तुम्हाला लवकरच परदेशात जाण्याची संधी मिळेल. आयात-निर्यातीत तुम्हाला लाभ मिळेल. तसेच, आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्यातील सकारात्मक गुण आज दिसतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांवर आज देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. तसेच, प्रत्येक क्षेत्रात तुमचा चांगला विस्तार पाहायला मिळेल. आज तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. तसेच, संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. ग्रहांची स्थिती शुभ असल्या कारणाने तुम्ही हाती घेतलेल्या कार्याला चांगलं यश मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमची विवेक बुद्धी चांगली असेल. तुम्ही परदेशात जाण्याचा देखील योग जुळून येणार आहे. तसेच, तुम्हाला भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ मिळेल. तुमच्या आरोग्यात देखील चांगली सुधारणा झालेली दिसेल. लवकरच घरात शुभ कार्याचं आयोजन केलं जाईल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. सामाजिक कार्यात तुमचं वेगळं व्यक्तिमत्व दिसून येईल, सामाजिक कार्यात तुम्ही सक्रिय असाल. तसेच, जवळच्या नातेवाईकांकडून तुमच्यासाठी लवकरच शुभवार्ता येणार आहे. तुम्हाला आर्थिक सुविधांचा चांगला लाभ घेता येईल. तसेच, तुमची वैवाहिक स्थिती चांगली असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















