(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gemini Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : मिथुन राशीचा नवीन आठवडा चढ-उतारांचा; करिअर-गृहस्थीत येणार अडथळे? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Gemini Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सावधगिरी बाळगण्याचा असेल. तुम्हाला नवीन आठवड्यात प्रत्येक गोष्टीत सतर्क राहावं लागेल.
Gemini Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : राशीभविष्यानुसार, मिथुन राशीसाठी नवीन आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. तुमची लव्ह लाईफ देखील या आठवड्यात चांगली असेल. या आठवड्यात तुमचे उत्पन्न स्रोत वाढतील. एकूणच मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini Love Horoscope)
या आठवड्यात लव्ह लाईफमध्ये मतभेद होऊ शकतात, वाद झाल्यास योग्य निर्णय घ्या. तुमच्या आधीच्या प्रियकराशी तडजोड करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. विवाहित लोकांनी विवाहबाद्य संबंध टाळावे, कारण त्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
मिथुन राशीचे करिअर (Gemini Career Horoscope)
या आठवड्यात तुम्हाला व्यावसायातील तुमचा दरारा दाखवण्याच्या अनेक संधी मिळतील. या आठवड्यात आयटी, हेल्थकेअर, लॉ, हॉस्पिटॅलिटी, इंजिनीअरिंग आणि डिझायनर्सचं शेड्युल पॅक असेल, तुमच्यावर कामाचा जास्त लोड असेल. नोकरदारांनी कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावं आणि प्रगतीच्या नवीन संधी शोधाव्या. या आठवड्यात कामादरम्यान रागावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक वाद टाळा.
मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini Wealth Horoscope)
नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील. तुम्ही तुमचं एकूण उत्पन्न आणि खर्च यात संतुलन ठेवलं पाहिजे. उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणुकीचे निर्णय अत्यंत हुशारीने घ्या. काही लोक या आठवड्यात शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात वडिलांकडून पैसे मिळू शकतात.
मिथुन राशीचे आरोग्य (Gemini Health Horoscope)
या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल. तुमच्या दैनंदिन जीवनात काही शारीरिक हालचालींचा समावेश करा. फिरायला जा, व्यायामशाळेत जा किंवा घरीच व्यायाम करुन पहा. सकस आहार घ्या आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या. स्वतः ची काळजी घेण्यात स्वत:ला व्यस्त करा, ध्यान देखील करा. आपल्या मानसिक आरोग्यासह शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :