IND vs WI, 3rd ODI, Match Highlights : शानदार! भारताचा वेस्ट इंडीजवर 119 धावांनी मोठा विजय, 3-0 ने मालिका जिंकत दिला व्हाईट वॉश
IND vs WI : भारतीय संघाने वेस्ट इंडीजला तिसऱ्या सामन्यातही मात देत मालिका 3-0 ने जिंकली आहे. 39 वर्षांत पहिल्यांदाच भारताने वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश दिला आहे.

IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना भारताने तब्बल 119 धावांनी जिंकत मालिकाही 3-0 च्या फरकाने जिंकली आहे. विशेष म्हणजे 1983 पासून प्रथमच भारताने वेस्ट इंडीजला त्यांच्या मायभूमीत व्हाईट वॉश दिला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली. तुफान फटकेबाजीनंतरही पावसाच्या व्यत्ययामुळे भारत 36 षटकंच खेळू शकला. यात 225 धावा भारताने केल्या. ज्यानंतर विजयासाठी वेस्ट इंडीजला 35 षटकात 257 धावा करायच्या होत्या. पण भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीनंतर 137 धावांतच वेस्ट इंडीज सर्वबाद झाल्याने भारताने सामना 119 धावांनी जिंकला आहे.
सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. हा निर्णय कर्णधार शिखरसह सलामीवीर गिलने योग्य ठरवत तुफान सुरुवात केली. शिखर अर्धशतक (58) झळकावून बाद झाल्यावर श्रेयसने गिलला साथ देत चांगला खेळ कायम ठेवला. नंतर श्रेयस (44) आणि पाठोपाठ सूर्यकुमार (8) बाद झाला. पण गिलने फटकेबाजी कायम ठेवली. पण सतत पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्यात विलंब झाला अखेर 36 षटकानंतर सामना थांबवण्यात आला. गिलने नाबाद 98 धावा केल्या असून आता वेस्ट इंडीज फलंदाजी करत असून त्यांना विजयासाठी 35 षटकांत 257 रन करायचे होते.
चहलच्या फिरकीची जादू
35 षटकात 257 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडीजला पहिल्या षटकातच सिराजने दोन दमदार झटके दिले. त्यानंतर एक-एक करत गडी बाद होत गेले. वेस्ट इंडीजकडून कर्णधार निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी सर्वाधिक 42 धावा केल्या. पण भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर कोणाचाच निभाव लागला नोही. ज्यामुळे अखेर भारकडून चहलने सर्वाधिक 4 गडी बाद केले. शार्दूल आणि सिराजने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेल आणि प्रसिध कृष्णा यांनी एक-एक विकेट घेतली. 137 धावांतच वेस्ट इंडीज सर्वबाद झाल्याने भारताने सामना 119 धावांनी जिंकला आहे. नाबाद 98 धावा ठोकणाऱ्या शुभमनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हे देखील वाचा -
- IOA-RIL Partnership : खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी रिलायन्स सज्ज, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनसोबत करणार भागिदारी
- ODI ranking : विराट कोहलीचं दृष्टचक्र संपेना, 7 वर्षांत सर्वात खराब एकदिवसीय क्रमवारी, रोहितची रॅकिंगही घसरली
- BCCI on WC ODI World Cup : 2025 महिला विश्वचषक भारतात, दणक्यात पार पाडणार स्पर्धा, बीसीसीयचा निर्धार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
