Sangli Crime : स्कार्पिओ गाडी अडवून तासगावमध्ये द्राक्ष व्यापाऱ्याकडून १ कोटी १० लाख रुपये लुटले
सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये द्राक्ष व्यापाऱ्याकडून १ कोटी १० लाख रुपये लुटण्यात आले. तासगाव हद्दीतील गणेश कॉलनी येथे अंधाराचा फायदा घेत स्कार्पिओ गाडी अडवून सहा ते सात जणांनी दरोडा टाकला. महेश केवलानी असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. ते मूळचे नाशिकचे आहेत... गेल्या काही वर्षांपासून ते तासगावात एका रो-हाऊसमध्ये राहतात. इथली द्रात्र ते बांगलादेशला पाठवतात. याच द्राक्षाचे पैसे आणण्यासाठी ते मंगळवारी स्कार्पिओ गाडीतून चालक व दिवाणजी सह सांगली येथे गेले होते.पैसे घेऊन ते गणेश कॉलनी कडे येत होते. कॉलनीमधल्या रोडवर त्यांची कार अडवण्यात आली.. दरोडेखोरांनी केवलानी आणि त्यांच्या दीवाणजीला मारहाण केली, आणि गाडीतली पैशांची बॅग घेऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुखांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. मात्र या घटनेने तासगाव शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.