Vijay Wadettiwar PC : 'Dhananjay Munde दहा बायका करा पण कुणाचा खून करु नका!'
Vijay Wadettiwar PC : 'Dhananjay Munde दहा बायका करा पण कुणाचा खून करु नका!'
"महाविकास आणि महायुतीमध्ये फरक आहे. हे महाराष्ट्र विकून खातील, तरी त्यांच्यावर कारवाई होणार नाही. महाराष्ट्रात खुलेआम महिलांचं शोषण होईल. खून करतील तरी कारवाई करणार नाहीत. चौकशी करतील. चित्रा ताई म्हणाल्या, मंत्री करु नये, तरी संजय राठोडांना मंत्री केलं गेलं. पूजा चव्हाणवरुन आरोप झाल्यानंतर आम्ही जरा सुद्धा वेळ घालवला नाही, लगेच काढून टाकलं. इकडे पाहा. प्रेम करणारी असूदेत..प्रेम करुन मारहाण करतात, सोडूनही देतात. तुमची परवानगी असेल तर 10-10 बायका करा, पण कोणाचा खून तरी करु नका", असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावरही सडकून टीका केलीये. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, संतोष देशमुख यांचं कुटूंब अजूनही रडतंय. महिलांच्या शोषनाच्याही अनेक घटना घडल्या आहेत. सरकारने या संदर्भात सीबीआय चौकशी केली पाहिजे. आकाच्या वर बाका आहे ते हे सर्व वाचवतोय. स्पेशल टीम लावली नाही. तुम्ही आरोपी शोधत नाही. मालमत्ता जप्त करत आहेत त्या खंडणी गोळा करुन जमा केल्या आहे. प्राजक्ता माळींबाबत बोलणार नाही. मात्र फिल्म इंडस्ट्रीतून यावर कोणी बोलत नाही.