TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP Majha
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११.४५ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार, दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार होणार.
दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या समाधीसाठी जागा द्या, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी. सूत्रांची माहिती.
कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली, डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाने आपण एक हुशार नेता गमावला, डॉ.मनमोहन सिंग यांच्याप्रती सोनिया गांधींनी व्यक्त केल्या भावना
माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्याकडून मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा, शेततळे योजनेला सिंग यांनी दोन मिनिटात दिली होती मंजुरी, तर त्यांच्या मारुती 800 गाडीवर त्यांचं खूप प्रेम होतं, सूर्यकांता पाटील यांची प्रतिक्रिया.
संतोष देशमुखांसाठी बीडमध्ये आज विराट मोर्चा, देशमुखांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते मोर्चात सहभागी होणार, यात बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी राजे भोसले आणि मनोज जरांगेंसह अनेक नेत्यांचा सहभाग.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग, वाल्मिक कराडांच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी, बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये कराडच्या पत्नीची चौकशी.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडें आणि पंकजा मुंडेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्या, रेणापूरमधील आक्रोश मोर्चाची तहसीलदारांना निवेदन देत मागणी.