Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 3 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 3 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात, राज्यातील विविध मंदिरात नवरात्रउत्स मोठ्या उत्साहात पार पडणार.
नवरात्रोत्सवानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. जेजुरी गड रोषणाईनं निघाला नाहून. रोषणाईची ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी.
यवतमाळमध्ये नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात, देखावे पाहण्यासाठी अन्य जिल्ह्यातील भाविकांची गर्दी. यावर्षी जिल्ह्यात दोन हजार 871 दुर्गोत्सव मंडळ मूर्तीस्थापना करणार.
बीडच्या अंबाजोगाईतील योगेश्वरी मंदिरात आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ. पाच लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल होण्याची शक्यता. मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई.
ठाण्याच्या टेंभी नाका परिसरातील जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या देवीच्या आगमनाची तयारी पूर्ण, नवसाला पावणारी दुर्ग दुर्गेश्र्वरी अशी या देवीची ख्याती.
विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवी आणि एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवाला आजपासून सुरूवात, मंदिराला आकर्षक रोषणाई.