(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझा
Sanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझा
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजता राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या (Mahayuti) गोटात हालचालींना सुरुवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एक्झिट पोलचे निकाल (Maharashtra Exit Poll 2024) समोर आल्यानंतर महायुतीने प्लॅन बी आखल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत बहुमतापासून दूर राहिल्यास महायुतीने छोट्याछोट्या पक्षांची मोट बांधायची रणनीती आखली आहे. जे पक्ष महायुतीत नाहीत, अशांशी संपर्क साधला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कोणत्याही अपक्षांच्या संपर्कात नसल्याचे गुरुवारी सांगितले होते. मात्र, महायुतीच्या गोटातून अपक्ष आणि बंडखोरांनी संपर्क साधण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. महायुतीचे नेते छोट्या घटकपक्षांशी बोलणी करत आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे आता राज्यात सत्तेतील वाटा देऊन घटक पक्षांना जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती आहे.
निकालापूर्वी ठाकरे गट सावध विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधल्याचे समजते. मतमोजणीवेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी तसंच उमेदवारांनी काय काळजी घ्यावी, यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि तज्ञांनी उमेदवार आणि प्रमुखांना मार्गदर्शन केल्याचे समजते. टपाली आणि EVM मधील मतमोजणीसंदर्भातील बारकावे, कोणत्या वेळी आक्षेप घ्यावेत, लेखी तक्रार याविषयी कालच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीतील उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात झालेल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी उद्धव ठाकरे आणि पक्षाकडून खबरदारी घेतली जात आहे.