(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russo-Ukrainian War : रशियानं युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केलीय, अनेक शहरात मोठे बॉम्बहल्ले
रशियानं युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केलीय. युक्रेनमध्ये सैन्य घुसवण्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी आदेश दिले आहेत. आणि या आदेशानंतर युक्रेनमधील अनेक शहरात मोठे बॉम्बहल्ले झाले आहेत. रशियाच्या लढाऊ विमानांनी आणि रशियन सैन्यानं युक्रेनमध्ये घुसण्यास सुरुवात केलेय. आज सकाळी राजधानी कीवमध्येही मोठे बॉम्बहल्ले झाल्याचं कळतंय. रशियानं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानं मात्र जग धास्तावलंय. सध्या युरोपातील ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स या देशांसह अमेरिकेनंही युक्रेनला पाठिंबा दिलाय. जसंच जगभरातून रशियावर निर्बंधही घालण्यात आलेत मात्र या कशालाही न जुमानता रशियानं युद्धाचं रणशिंग फुंकलंय. युक्रेन सीमेवर रशियाचे २ लाख सैनिक तैनात असल्याचा दावा युक्रेनच्या पंतप्रधानांनी केलाय. युक्रेनमध्ये आणीबाणी लागू करण्यात आलेय. युक्रेनमधील सर्व देशांतर्गत विमानवाहतूक बंद ठेवण्याचे आदेश युक्