Nitin Raut on Chhagan Bhujbal : भुजबळ आमच्यासोबत आल्यास त्यांचं स्वागत - नितीन राऊत
Nitin Raut on Chhagan Bhujbal : भुजबळ आमच्यासोबत आल्यास त्यांचं स्वागत - नितीन राऊत
छगनराव (Chhagan Bhujbal) तुम्हाला खूप उशिरा लक्षात आले की या लोकांची पद्धतच ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या विरोधात काम करण्याची आहे. छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झालाय. छगन भुजबळ तुम्ही एकदा पुन्हा विचार करा की कोणासोबत राहायचं आणि कसं राहायचं. छगन भुजबळ सारख्या व्यक्ती आमच्या सोबत काम करायला तयार असेल तर आम्ही त्याचा स्वागत करू. अशी खुली ऑफर देत काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर दिली आहे.
छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवारी झाला. यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाल्याचे आहेत. त्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर देण्यात आली आहे. छगन भुजबळ आमच्यासोबत काम करायला तयार असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसचा गट नेता निवडण्यात आधीच उशीर झाला आहे, आणखी उशीर केलं जाऊ नये, राष्ट्रात काँग्रेस पक्षाला उभे करण्याची गरज आहे. असे म्हणत काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.