Parbhani Case | परभणी हिंसाचारावरून मुख्यमंत्री फडणवीसांंचं विधानसभेत निवेदन ABP Majha
Parbhani Case | परभणी हिंसाचारावरून मुख्यमंत्री फडणवीसांंचं विधानसभेत निवेदन ABP Majha
परभणी हिंसाचारावर विधानसभेत निवेदन देत, संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आंदोलक सोमनाथ सूर्यवंशींचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप फडणवीसांना फेटाळला. सूर्यवंशींना श्वसनाचे आजार होते, तसंच वैद्यकीय चाचणीत जुन्या जखमांचाही उल्लेख आढळलाय असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलं. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदतही सरकारतर्फे जाहीर करण्यात आलीय... परभणी आंदोलनानंतर कोम्बिंग ऑपरेशन केलं जात असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत होते. मात्र असं कोम्बिंग ऑपरेशन झालं नाही, संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच अटकेची कारवाई केली असं फडणवीस म्हणाले. मात्र वाजवीपेक्षा बळाचा अधिक वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षक घोरबांड यांना निलंबित करण्यात आलंय.