ABP Majha Headlines : 05 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
मुन्नी कोण हे सुरेश धस यांनाच विचारा, अजित पवारांचं वक्तव्य...मुन्नीच्या म्हणण्यावरुन मिटकरी टीका करत असल्याचा धस यांनी केला होता आरोप...
आरोप सिद्ध न झाल्यास कारवाई करणं कितपत योग्य, बीड प्रकरणावरुन अजित पवारांचा सवाल...पक्ष न बघता दोषींवर कारवाई करण्याबाबत फडणवीसांशी बोलल्याची माहिती...
आकानं भरपूर माल जमावला, त्यांच्याकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावर जमिनी, पैठणमधल्या मोर्चात सुरेश धस यांचा आरोप...तर वाल्मिक कराडवर पीएमएलएअंतर्गत कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल...
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाला एक महिना पूर्ण..राजकारण शिगेला मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा, हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये मोर्चा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी...मराठा व्यतिरिक्त आणि वेळ देणारे प्रदेशाध्यक्ष हवेत, पदाधिकाऱ्यांची पवारांशी चर्चा...
केजरीवालांचा पक्ष चांगला असेल तर पृथ्वीराज चव्हाणांनी 'आप'मध्ये जावं, काँग्रेस नेते संदीप दीक्षितांचा खोचक सल्ला...दिल्ली विधानसभेसंदर्भातील वक्तव्याचा विपर्यास, चव्हाणांची सारवासारव...
राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या १२ आमदारांबाबत महायुतीला मोठा दिलासा... कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर...आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली...
ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा आम आदमी पक्षाला पाठिंबा