Natu Natu Oscar Special Report : आरआरआर चित्रपटाची ऑस्करला गवसणी, नाटू नाटू शब्दाचा नेमका अर्थ काय?
ऑस्कर 2023'मध्ये एस.एस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर पुरस्कार आरआरआर या व्यावसायिकदृष्ट्या देशभरात यशस्वी ठरलेल्या चित्रपटानं आज नवा इतिहास घडवला. मूळ तेलुगू भाषेतल्या या चित्रपटातल्या नाटू नाटू गाण्याला ९५व्या अॅकॅडमी अॅवॉर्ड सोहळ्यात ओरिजिनल सॉन्ग विभागात ऑस्करनं गौरवण्यात आलं. आरआरआर चित्रपटातल्या नाटू नाटू या गाण्याला नुकतंच गोल्डन ग्लोब पुरस्कारानंही गौरवण्यात आलं आहे. एस एस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाला एम एम किरावनी यांनी संगीत दिलं आहे. गीतकार चंद्रबोस यांनी लिहिलेलं हे गीत राहुल शिप्लीगुंज आणि कालभैरवा यांनी गायलं आहे. या गाण्यावर प्रेम रक्षित यांनी केलेल्या कमालीच्या नृत्यदिग्दर्शनालाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. विशेष म्हणजे अॅकॅडमी अॅवॉर्ड सोहळ्यात राहुल शिप्लीगुंज आणि कालभैरवा या मूळ गायकांना नाटू नाटू हे गीत सादर करण्याची संधी देण्यात आली होती.त्याआधी अभिनेत्री दीपिका पडुकोणला हे गाणं आणि चित्रपटाविषयी निवेदन केलं.