Strong Password : लक्षात राहतो म्हणून कोणताही पासवर्ड सेट नका; एक चूक आयुष्यभरासाठी महागात पडेल, तुमचा पासवर्ड कसा सेट कराल?
जर तुम्ही लोकांचं ऐकत असाल आणि पासवर्ड म्हणून कोणताही कोड टाकून मोकळे होत असाल तर थांबा आधी ही बातमी वाचा. ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही काळजीपूर्वक पासवर्ड टाकाल.
Strong Password : हॅकर्स काही सेकंदात कॉमन (Password )पासवर्ड कसे क्रॅक करतात हे आम्ही सांगितले आहे. आम्ही अनेक एजन्सींची यादीही शेअर केली आहे, ज्यात जागतिक स्तरावर वापरला जाणारा कॉमन पासवर्ड सांगितला आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमच्या डिजिटल अकाऊंटचा पासवर्ड सेट करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. जर तुम्ही लोकांचं ऐकत असाल आणि पासवर्ड म्हणून कोणताही कोड टाकून मोकळे होत असाल तर थांबा आधी ही बातमी वाचा. ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही काळजीपूर्वक पासवर्ड सेट कराल.
सुरक्षित पासवर्ड कोणता?
पासवर्ड सुरक्षित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याची लांबी वाढविणे. हॅकर्ससाठी लांबलचक पासवर्ड क्रॅक करणे अवघड आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, 'स्ट्राँग' पासवर्ड कमीत कमी 12 अक्षरांचा असावा. इन-सोल्युशन्स ग्लोबलचे चीफ स्ट्रॅटेजी अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर सचिन कॅस्टेलिनो यांच्या मते, "स्ट्राँग पासवर्ड कमीत कमी 12 अक्षरांचा असावा, त्यात अप्पर केस, लोअर केस लेटर्स, नंबर्स आणि स्पेशल कॅरेक्टर्स असावेत.
वीक पासवर्ड- 987456321
स्ट्राँग पासवर्ड- @globalTech5018P
जन्मतारीख किंवा ठिकाणाचे नाव यासारख्या वैयक्तिक गोष्टी टाळा
पासवर्ड बनवताना तुमची वैयक्तिक माहिती जसे की जन्मतारीख किंवा ठिकाणाचे नाव, वर्धापनदिन, मुलांचे नाव ठेवू नका. आपल्या डेटाशी संबंधित पासवर्ड सोशल डोमेनमध्ये अजिबात ठेवू नका. हॅकर्सची पहिली नजर तुमच्या डिजिटल डेटावर असते. रॅंडम कॅरेक्टर्स एकत्र करून पासवर्ड तयार करा, जो तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित नाही. तसेच आपला पासवर्ड, मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगपिन कुठेही लिहू नका, यामुळे तुमच्या खात्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. जर एखाद्याला तो कागद किंवा फाईल सापडली तर ते सहजपणे आपल्या खात्यात प्रवेश करू शकतात.
दर 60 किंवा 90 दिवसांनी बदल
दर 60 किंवा 90 दिवसांनी आपले पासवर्ड बदला जेणेकरून ते हॅक होण्याची शक्यता कमी होईल. केवळ पासवर्डच नाही तर तुमचे अॅप्स ही नियमितपणे अपडेट करत रहा जेणेकरून त्यात कोणताही दोष राहणार नाही. दर तीन ते सहा महिन्यांनी आपला पासवर्ड बदलण्यासाठी एक रिमाइंडर सेट करा जेणेकरून आपल्याला ते लक्षात राहील.
इतर महत्वाची बातमी-