Samsung Galaxy S 24 Series : Samsung Galaxy Unpacked 2024 इव्हेंट कधी होणार? 3 स्मार्टफोन लाँच होणार, टीझर रिलीज!
कोरियन कंपनी सॅमसंग हा फोन Galaxy Unpacked 2024 इव्हेंटमध्ये लाँच करणार आहे. कंपनीचा गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट 18 जानेवारीला होणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे.
Samsung Galaxy S 24 Series: 2024 मधील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोनपैकी एक म्हणजे Galaxy S 24 Ultra. आतापर्यंत मोबाइल फोनचे स्पेसिफिकेशन, डिझाइन आणि डिस्प्लेबाबत अनेक प्रकारची माहिती समोर आली आहे. कोरियन कंपनी सॅमसंग हा फोन Galaxy Unpacked 2024 इव्हेंटमध्ये लाँच करणार आहे. कंपनीचा गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट 18 जानेवारीला होणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे.
सॅमसंगची ही पहिलीच सीरिज असेल ज्यात AI फिचर्स उपलब्ध असतील. लीकनुसार, Galaxy S 24 सीरिजमधील कस्टम वॉलपेपर जनरेशन, रिअल-टाइम कॉल ट्रान्सलेशन हे फिचर्स देण्यात आले आहेत. गुगलच्या पिक्सल फोनमध्ये असे फीचर आधीच उपलब्ध आहे. सॅमसंगच्या नेमक्या कोणत्या मॉडेलमध्ये हे AI फिचर देण्यात येणार आहे, यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही आहे.
टायटॅनियम फ्रेम उपलब्ध
आयफोन 15 प्रो मॅक्सप्रमाणेच यावेळी गॅलेक्सी एस 24 अल्ट्रामध्ये तुम्हाला टायटॅनियम फ्रेम, फ्लॅट डिस्प्ले आणि थिन बेजल्स मिळतील. गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा मध्ये मागील वेळेप्रमाणे 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात येणार आहे. रोलंड क्वांडने शेअर केलेल्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी S24, S24 प्लस आणि S 24 अल्ट्रा ब्लॅक, ब्लू, व्हाईट आणि गोल्ड कलर ऑप्शनमध्ये बाजारात येऊ शकतात. सर्व मॉडेल्समध्ये फ्लॅट डिस्प्ले आणि अल्ट्राला नेहमीप्रमाणे एस-पेन मिळेल. गॅलेक्सी एस 24 सीरिजमध्ये Exynos 2300 या Snapdragon 8 Gen 3 SoC , कमीतकमी 8/12GB जीबी रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असण्याची शक्यता आहे.
'हे' आहेत काही नवीन फीचर्स
सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन सिरीजबद्दल प्रत्येकजण उत्सुक आहे. दरम्यान, काही नवीन फिचर्स समोर आले आहेत. कोरियन कंपनी असलेल्या सॅमसंग जानेवारीमध्ये Galaxy S24 सीरीज लॉन्च करणार आहे. या सिरीज अंतर्गत 3 स्मार्टफोन लॉन्च केले जातील, त्यापैकी सर्वात खास Samsung Galaxy S24 Ultra असेल. मागील फोनप्रमाणे या मोबाईल फोनमध्ये 200MP कॅमेरा असेल. मात्र, यावेळी या सिरीजमध्ये AI चा सपोर्ट मिळणार आहे कारण यामध्ये Qualcomm ची नवीन चिप दिली जात आहे. दरम्यान, Galaxy S24 Ultra बाबत काही नवीन लीक्स समोर आले आहेत. Galaxy S23 ची कॅमेरा क्वालिटी चांगली असूनही फोटो कधीकधी ओव्हर सॅच्युरेटेड झाल्यामुळे आपल्याला फोटोंमधील रंग मूळ दिसत नाहीत. Galaxy S24 Ultra मध्ये ही समस्या दूर करण्यात आली आहे आणि यामध्ये तुम्हाला चांगलं सॅचुरेशन आणि शार्पनेस मिळेल.
इतर महत्वाची बातमी-