Video : 'रॉयल' विजयानंतर बोल्टनं मनही जिंकले, छोट्या चाहत्याला गिफ्ट केली जर्सी
IPL 2022 : राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.
Trent Boult Video Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Qualifier 2 IPL 2022 : राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. आता रविवारी गुजरातविरोधात राजस्थानची रॉयल लढत होणार आहे. शुक्रवारी आयपीएल 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सात विकेटने विजय मिळवला. आरसीबीविरोधात राजस्थानने सामना जिंकल्यानंतर स्टेडिअममध्ये एक आश्चर्यचकीत करणारा नजारा पाहायला मिळाला...राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने छोट्याशा चाहत्याला आपली जर्सी भेट दिली... बोल्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय..
बोल्ट सामन्यानंतर स्टेडिअममध्ये जात होता. त्यावेळी एक चिमुकला चाहता तिथे होता.. त्या चाहत्याला बोल्टने अंगावरील जर्सी काढून दिली... या कृतीमुळे बोल्टने मन जिंकलेय. याचा व्हिडीओ राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर शेअर केलायय....बोल्टच्या मोठेपणाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे...
पाहा व्हिडीओ ........
View this post on Instagram
आयपीएल 2022 मध्ये ट्रेंट बोल्टने दमदार कामगिरी केली आहे. बोल्टने यंदाच्या हंगामात 15 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. शुक्रवारी राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केलाय. आता रविवारी रात्री या दोन संघामध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे. राजस्थानचा संघ तब्बल 14 वर्षानंतर फायनलमध्ये पोहचलाय. तर गुजरातच्या संघाने आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामात फायनलमध्ये धडक मारली आहे. दरम्यान, साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सनेही दमदार कामगिरी केली होती. राजस्थान रॉयल्सने 14 सामन्यात नऊ विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला होता. राजस्थानला क्वालिफायर 1 सामन्यात गुजरातकडून पराभव स्विकारावा लागला होता. तर क्वालिफयर 2 मध्ये आरसीबीचा पराभव करत राजस्थान रॉयल्सने फायनलमध्ये प्रवेश केलाय.