एक्स्प्लोर

आकडेच बोलतात.... हैदराबादविरोधात चेन्नईचे पारडे जड, वाचा सविस्तर

आज संध्याकाळी साडेसात वाजता हैदराबाद चेपॉकच्या मैदानावर चेन्नईसोबत भिडणार आहे.

CSK vs SRH Match Prediction : चेन्नई आणि हैदराबाद या दक्षिणेकडील दोन्ही संघात आज काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे. गुणतालिकेत चेन्नईचा संघ तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तर हैदराबादचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत पोहचण्यासाठी हैदराबादला विजय गरजेचाच आहे. पण  ओवरऑल रिकॉर्ड, सध्याची कामगिरी पाहाता सर्व गोष्टी हैदराबादच्या विरोधातच जातात. चेन्नईविरोधात हौदराबादची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. चेन्नई संघाने एकतर्फी विजय मिळवल्याचे आकडेवारीवरुन दिसतेय. 

CSK आणि SRH यांच्यामध्ये आतापर्यंत 19 सामने झाले आहेत. यामध्ये फक्त पाच सामन्यात हैदराबादला विजय मिळाला आहे.  तर चेन्नईने 14 सामन्यात बाजमी मारली आहे. मागील पाच सामन्याचा विचार केला तर यामध्ये चार विजय चेन्नईने मिळवले आहेत. तर फक्त एका सामन्यात हैदराबादचा विजय झाला आहे. आकडेवारीवरुन चेन्नईचे पारडे जड दिसतेय. पण क्रिकेटच्या मैदानात कधी काय होईल, याचा नेम नाही. त्यामुळे हैदराबादचा संघ आज आपले आकडे सुधारण्यासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

CSK ला होम ग्राउंडवर हरवणे सोपे नाही -

आज संध्याकाळी साडेसात वाजता हैदराबाद चेपॉकच्या मैदानावर चेन्नईसोबत भिडणार आहे. चेन्नने चेपॉकला आपला किल्ला केलाय. आतापर्यंत या मैदानात मुंबई आणि राजस्थान या संघाला विजय मिळवता आला आहे. मागील दहा वर्षात चेन्नईत इतर संघांना विजय मिळवता आला नाही. अशा परिस्थितीत चेन्नईला होम ग्राऊंडवर पराभूत करणे हैदराबादपुढे मोठे आव्हान असेल.

चेपॉकची खेळपट्टी कशी ? 

चेपॉकची आजची खेळपट्टी मागील सामन्याप्रमाणेच दिसत आहे. येथे फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल. त्यामुळे आजच्या सामन्यात फिरकी गोलंदाजांचा दबदबा दिसू शकतो. दोन्ही संघामध्ये अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळवला जाऊ शकतो. चेपॉकच्या खेळपट्टीवर फलंदाजांनाही मदत आहे.. पण वेगवान गोलंदाजांना इथे फारशी मदत मिळण्याची शक्यता नाही.  

चेन्नई वरचढ - 

आकडेवारी आणि सध्याची परिस्थिती पाहाता आजच्या सामन्यात चेन्नईचे पारडे जड दिसत आहे. चेन्नईने यंदाच्या हंगामात आतापर्यंत पाच पैकी तीन सामन्यातविजय मिळवला आहे.  तर हैदराबादने पाचमध्ये तीन सामने गमावले आहेत. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. कागदोपत्री दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत. पण सध्याची परिस्थिती आणि आकडे पाहिल्यास चेन्नईचा संघ वरचढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. चेन्नईकडे फिरकी गोलंदाजांची फौज आहे. चेपॉकवर फिरकीला मदत मिळते, त्यामुळे चेन्नई आजच्या सामन्यात फेव्हरेट असू शकते.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget