एक्स्प्लोर

असा कर्णधार होणे नाही, रोहितची IPL मधील कामगिरी एकदा पाहाच!

Rohit Sharma as a captain in the IPL: रोहित शर्मा मुंबईचा नव्हे तर आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माने मुंबईला यशाच्या शिखरावर नेलं. मुंबईसाठी रोहित शर्मासारखा कर्णधार पुन्हा मिळणं, कठीण आहे. 

Rohit Sharma :  आगामी आयपीएल हंगामाआधी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला. मुंबईने संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवली. आता रोहित शर्मा आयपीएलमध्ये कर्णधार नसेल.  हार्दिक पांड्या मुंबईच्या ताफ्यात परतल्यानंतर तो कर्णधार होईल, असा अंदाज वर्तवला होता. आज त्यावर शिक्कामोर्तब झालेय. रोहित शर्मा मुंबईचा नव्हे तर आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माने मुंबईला यशाच्या शिखरावर नेलं. मुंबईसाठी रोहित शर्मासारखा कर्णधार पुन्हा मिळणं, कठीण आहे. 

Rohit Sharma as a captain in the IPL: आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून रोहितची कामगिरी - 

रोहित शर्माने 24 एप्रिल 2013 रोजी मुंबई इंडियन्सचं नेतृत्व स्विकारलं. आता दहा वर्षानंतर 14 डिसेंबर 2023 रोजी मुंबईने रोहितला कर्णधारपदावरुन काढलं. या दहा वर्षात रोहित शर्माने मुंबईला आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ केलाय. 2008 ते 2013 या कालावधीत मुंबईला एकदाही जेतेपद पटकावता आले नाही. सचिन, भज्जी आणि पाँटिंगसारखे दिग्गज असतानाही मुंबईला जेतेपद मिळाले नाही. पण रोहितने मुंबईमध्ये जान फुकंली. रोहितच्या नेतृत्वात मुंबईची कामगिरी.... 

2013 - विजेता
2014 - प्लेऑफ
2015 - विजेता
2016 - साखळी फेरी
2017 - विजेता
2018 - साखळी फेरी
2019 - विजेता
2020 - विजेता
2021 - साखळी फेरी
2022 - साखळी फेरी
2023 - प्लेऑफ

रोहितचं आयपीएल करियर -

रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच आयपीएल चषकावर नाव कोरलेय. 2013 पासून रोहित शर्माने मुंबईची धुरा संभाळली होती.  2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने चषकावर नाव कोरले होते. रोहित शर्माची आयपीएलमधील कामगिरीही शानदार राहिली आहे. रोहितने 243 सामन्यात 6211 धावा चोपल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित शर्माने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.  

रोहित शर्माने मुंबईला ब्रँड केले....  

2013 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पहिले आयपीएल जेतेपद पटकावले. मुंबईसाठी रोहित शर्मा हिरो ठरला. जे काम सचिन, भज्जी अन् पाँटिंगला करता आले नाही, ते युवा रोहित शर्माने करुन दाखवलं. त्याचवर्षी मुंबईने चॅम्पियन्स लीग स्पर्धाही जिंकली. रोहित शर्माने 2013 पासून मागे वळून पाहिले नाही. रोहित शर्माने पाच वेळा मुंबईला चषक जिंकून दिला. 2014 मध्ये मुंबईला जेतेपद राखता आले नाही. लागपाठ पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, पण रोहितने हार मानली नाही. पहिल्या पाच सामन्यात पराभव झाल्यानंतरही मुंबईने प्लेऑफमध्ये जागा मिळवली होती. मुंबईला जेतेपद राखता आले नाही. पण रोहितच्या नेतृत्वाने सर्वांनाच भूरळ पाडली.  

रोहित पर्व

2013 मध्ये जेतेपद मिळणारा मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या मैदानात शानदार कामगिरी सुरुच ठेवली. 2014 चं जेतेपद राखता आले नाही. पण 2015 मध्ये मुंबईने पुन्हा एकदा जेतेपद पटकावले. 2016 सरासरी राहिलं. पण 2017 मध्ये पुन्हा एकदा रोहितच्या नेतृत्वात मुंबईने चषकावर नाव कोरले. त्यानंतर 2018 मध्येही मुंबईने चषक उंचावला.  पण 2018 मध्ये मुंबईला प्लेऑफमध्येही स्थान पटकावता आले नाही. पण त्यानंतर 2019 आणि 2020 मध्ये मुंबई इंडियन्सने चषकावर नाव कोरले. मुंबईने आयपीएलच्या इतिहासात पाच वेळा चषकावर नाव कोरले. आयपीएलच्या इतिहासातील मुंबई हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो.  2020 नंतर मुंबईला लागोपाठ तीन हंगामात लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच यंदा हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले. पण सचिन, पाँटिंग अन् भज्जीला जमलं नाही ते रोहितनं करुन दाखवलं. त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतल्यामुळे चाहत्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर रोष व्यक्त केला जातोय. चेन्नईचं कर्णधारपद धोनी 40 वर्षानंतरही करत असेल तर रोहितला कायम का ठेवलं नाही? असा सवाल विचारण्यात येतोय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget