एक्स्प्लोर

स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाच्या पत्नीचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले ही तर सर्वात सुंदर महिला, रोहननंही दिला रिप्लाय

Rohan Bopanna Wife : ऑस्ट्रेलियन ओपनच्या वेळी रोहन बोपण्णाची पत्नी त्याला चिअर करण्यासाठी मेलबर्नमध्ये उपस्थित होती. यादरम्यानचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rohan Bopanna Wife Photo Went Viral : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) ऑस्ट्रेलियन ओपन 2023 च्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. पण मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झाच्या जोडीला जेतेपदाच्या लढतीत ब्राझीलच्या जोडीसमोर 7-6, 6-2 असा पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान रोहनला चिअर करण्यासाठी त्याची पत्नी सुप्रिया अन्नैया संपूर्ण स्पर्धेदरम्यान मेलबर्नमध्ये उपस्थित होती. ज्यानंतर आता बोपण्णाच्या पत्नीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यादरम्यान एका महिला फॅनने रोहनच्या पत्नीचा फोटो शेअर करत  सर्वात सुंदर महिला असं लिहिलं आहे. ज्यावर रोहननंही रिअॅक्ट केलं आहे.

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या सामन्यादरम्यान रोहनची पत्नी आपल्या नवऱ्याला चिअर करत होती. यादरम्यान सुप्रिया अन्नय्यावर कॅमेरा गेला. यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका महिला चाहत्याने ट्विट करून लिहिले, ही रोहन बोपण्णाची पत्नी आहे का? मी पाहिलेली सर्वात सुंदर स्त्री. फोटोमध्ये रोहनची पत्नी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

बोपण्णाने केली कमेंट 

महिला फॅनच्या प्रतिक्रियेला रोहन बोपण्णाने देखील उत्तर दिलं. ट्विट करून उत्तर देताना त्याने लिहिलं की, मी तुमच्या मताशी सहमत आहे. रोहन बोपण्णा आणि अन्नय्या हे बंगळुरूचे रहिवासी आहेत. या स्टार कपलने 2012 मध्ये लग्न केले होते.  

बोपण्णाचं विजयाचं स्वप्न अधुरं

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावण्याचे रोहन बोपण्णाचे स्वप्न अपूर्ण राहिले. जर त्याने हे विजेतेपद पटकावले असते तर हे त्याचे दुसरे मिश्र दुहेरी ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले असते. यापूर्वी, 2017 मध्ये, गॅब्रिएला डब्रोव्स्कीसह तिने फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. त्याने विजेतेपदाच्या लढतीत कोलंबियाच्या रॉबर्ट फराह आणि अॅना लीना ग्रोनफेल्डचा पराभव केला होता.

सानिया-रोहन जोडीची दमदार कामगिरी

सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. फायनलमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी संपूर्ण स्पर्धेत त्यांनी अप्रतिम कामगिरीक केली होती. उपांत्य फेरीत भारताच्या या जोडीनं ग्रेट ब्रेटनच्या नील स्कूप्स्की आणि यूएसएच्या देसीरा क्रॉज्जिक या जोडीचा पराभव केला. सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना यांनी 7-6(5) 6-7(5) 10-6 या फरकाने सामना जिंकत फायनलमध्ये धडक मारली होती. विशेष म्हणजे उपांत्यफेरीपर्यंत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीमध्ये सानिया मिर्जा आणि रोहन बोपन्ना या जोडीनं फक्त एक सेट गमावला होता. उपांत्य फेरीत त्यांना एका सेटमध्ये पराभव पाहावा लागला. याचा अपवाद वगळता मिश्र दुहेरी स्पर्धेत सानिया आणि रोहन बोपन्ना यांचा आधीच्या सामन्यात एकाही सेटमध्ये पराभव झाला नाही. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget