CWG 2022 : भाविना पटेलची कमालं! पॅरा टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक, सोनलबेनने जिंकलं कांस्य
Para Table Tennis: भारताची आघाडीची पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलने कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला मिळवून दिलेल्या या सुवर्णपदकामुळे भारताची गोल्ड मेडल्सची संख्या 13 झाली आहे.
Commonwealth Games 2022 : भारतीय खेळाडू आज कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) अक्षरश: पदकांचा पाऊस पाडत आहेत. कुस्तीत तीन सुवर्णपदकं मिळवल्यानंतर भारताची दिग्गज पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलने आणखी एक गोल्ड मेडल जिंकून दिलं आहे. तिने पॅरा टेबल टेनिसच्या महिला एकेरीत (वर्ग 3-5)हे पदक मिळवलं आहे. यासह पॅरा टेबल टेनिसमध्येच भारताच्या सोनलबेन पटेलने कांस्यपदक मिळवलं आहे.
भाविनाने फायनलमध्ये नायजेरियाच्या Ifechukwude Christiana Ikpeoyi हिला 12-10, 11-2 आणि 11-9 अशा तीन सेट्समध्ये मात देत सामना जिंकला. याआधी भाविनाने उपांत्य फेरीच्या (Semifinal) सामन्यात इंग्लंडच्या सू बेलीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवत पदक निश्चित केलं होतं. भाविनाने जिंकलेल्या या पदकामुळे भारताची सुवर्णपदकांची संख्या 13 झाली आहे.
BHAVINA WINS G🤩LD
— SAI Media (@Media_SAI) August 6, 2022
History Maker at #Tokyo2020 Paralympics @BhavinaOfficial wins her maiden medal at #CommonwealthGames 😍😍
With a straight 3-0 victory over 🇳🇬's I. Ikpeoyi, Bhavina maintains her unbeaten streak at #B2022 🔥
Phenomenal effort 💙
Congratulations!#Cheer4India pic.twitter.com/kctTdvLXIl
सोनलबेनला कांस्य पदक
भाविनाने सुवर्णपदक जिंकलं असून दुसरीकडे सोनलबेन मनुभाई पटेल हिने कांस्य पदकाची कमाई केली आहे. तिने देखील महिला एकेरीच्या वर्ग 3-5 मध्येच ही कामगिरी केली आहे. भाविनाने सेमीफायनलमध्ये मात दिलेल्या इंग्लंड्या सू बेलीला 34 वर्षीय सोनलबेनने 11-5, 11-2 आणि 11-3 अशा फरकाने मात देत कांस्य पदक जिंकलं आहे.
BRONZE FOR SONAL 🤩
— SAI Media (@Media_SAI) August 6, 2022
Tokyo Paralympian & Asian Para Games 🥈 medalist @SonuPTTOfficial wins 🥉 after defeating 🏴's Sue Bailey in straight sets 3-0 winning her maiden medal at #CommonwealthGames 💪
Sonal's hard work has paid off, her wait for a CWG 🏅is finally over🙂
Congrats! pic.twitter.com/kDg4nhdf4I
भाविना भारताची दिग्गज पॅरा टेबल टेनिसपटू
भाविना पटेल सर्वात आधी 2011 च्या थायलंड टेबल टेनिस चॅम्पियनशिपमधून प्रकाशझोतात आली. पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत तिने त्यावेळी सुवर्णपदक पटकावले. नंतर, 2013 मध्ये0 आशियाई पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपच्या महिला एकेरीतही रौप्य पदक जिंकले. ती इथेच थांबली नाही. यानंतर त्याने 2017 मध्ये आशियाई पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत पुन्हा एकदा कांस्यपदकाला गवसणी घातली. मागील वर्षी टोक्यो पॅरालिम्पिकमध्येही तिने कमाल कामगिरी करत थेट रौप्यपदक मिळवलं. हे तिच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात मोठे यश होते. आता कॉमनवेल्थमध्ये ती रौप्य पदकाला सुवर्णपदकात बदलेल का याकडे भारतवासिय़ांचे लक्ष आहे.
हे देखील वाचा-