CWG 2022 : बॉक्सर जॅस्मीन सेमीफायनलमध्ये पराभूत, कांस्य पदकावर मानावं लागलं समाधान, अमित-नीतू मात्र फायनलमध्ये
Commonwealth Games 2022 : भारताची महिला बॉक्सर जॅस्मीनला इंग्लंडच्या जेमा रिचर्डसनने सेमीफायनलमध्ये 3-2 च्या फरकाने मात दिली आहे.
Commonwealth games Boxer Jasmine : भारतीय कुस्तीपटूनंतर आता बॉक्सर्सही कमाल फॉर्ममध्ये दिसत आहेत. अमित पांघल, नीतू यांनी फायनलमध्ये पोहोचले असून बॉक्सर जॅस्मिन मात्र सेमीफायनलमध्ये पराभूत झाली आहे. त्यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे.
JAISMINE CLINCHES BRONZE 🥉
— SAI Media (@Media_SAI) August 6, 2022
🇮🇳's rising pugilist @BoxerJaismine 🥊 (W-60kg) wins 🥉 on her debut at #CommonwealthGames
The prestigious Boxam Int'l 🥈 Medalist & Asian C'ships 🥉 medalist has added another major medal to her name
Great Effort!!#Cheer4India#India4CWG2022 pic.twitter.com/DGvHkTJJCN
जॅस्मिनला सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडच्या जेमा रिचर्डसनने 3-2 च्या फरकाने मात दिली आहे. महिलांच्या 57 ते 60 किलो वजनी गटातील हा सामना अत्यंत चुरशी झाला. जॅस्मीन आणि जेमा या दोघींनी एकमेकिंविरुद्ध तगडं आव्हान सादर केलं. पण अटीतटीच्या सामन्यात केवळ एका गुणाच्या फरकाने जेमा विजयी होत फायनलमध्ये पोहोचली आहे. पण बॉक्सिंगच्या नियामांनुसार बॉक्सर जॅस्मिनला कांस्य पदक मिळालं आहे.
अमित-नीतूचं पदक निश्चित
जॅस्मिन पराभूत झाली असली तरी भारताचा अनुभवी बॉक्सर अमित पांघलने (Amit Panghal) पुरुषांच्या फ्लाईवेट कॅटेगरीत 48 ते 51 किलो वजनी गटात सेमीफायनलचा सामना जिंकत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्याने जॉम्बियाचा बॉक्सर पॅट्रिक चिनयेम्बा याला 5-0 च्या फरकाने मात देत अंतिम फेरीत झेप घेतली आहे. ज्यामुळे भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. पुरुषांसह महिलांच्या 45 ते 48 किलो वजनी गटात भारताच्या नीतू घंघासने (Neetu Ghanghas) कॅनडाच्या प्रियांका ढिल्लोंला मात देत फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. त्यामुळे त्याठिकाणी देखील भारताचं किमान रौप्य पदक निश्चित झालं आहे.
हे देखील वाचा-