FIFA World Cup France vs England: इंग्लंडचं स्वप्न भंगलं; फ्रान्सचा दणदणीत विजय, सेमीफायनल्समध्ये 'या' चार संघांची धडक
FIFA World Cup France vs England: फान्सची इंग्लंडवर मात. फिफा विश्वचषकाच्या सेमीफायनल्समध्ये धडक. पुढची लढत मोरोक्कोशी.
FIFA World Cup France vs England: कतारचे यजमानपद असलेल्या FIFA विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) च्या मोसमात शनिवारी (10 डिसेंबर) उशिरा चौथा उपांत्यपूर्व सामना खेळला गेला. या सामन्यात गतविजेता फ्रान्स (France) आणि इंग्लंड (England) संघ आमनेसामने होते. अत्यंत रोमांचक अशा सामन्यात फ्रान्सनं 2-1 अशा फरकानं इंग्लंडवर मात करत शानदार विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पहिल्यांदाच इंग्लंडचा पराभव केला आहे. यापूर्वी 1966 आणि 1982 मध्ये इंग्लंडनं फ्रान्सचा पराभव केला होता.
या विजयासह फ्रान्सनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जिथे फ्रान्सचा संघ मोरोक्कोशी भिडणार आहे. मोरोक्कोच्या संघानं उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दमदार खेळी करत दिग्गज फुटबॉरल ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या पोर्तुगालचा 1-0 अशा फरकानं पराभव केला. दरम्यान, 14 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे.
फीफा वर्ल्ड कप सेमीफाइनल शेड्यूल
13 डिसेंबर : क्रोएशिया Vs अर्जेंटीना (रात्री उशिरा 12.30 वाजता)
14 डिसेंबर : मोरक्को Vs फ्रान्स (रात्री उशिरा 12.30 वाजता)
फान्स विरुद्ध इग्लंड कोणी कधी केले गोले?
पहिला गोल : फ्रान्ससाठी 17व्या मिनिटांत ग्रीजमॅनच्या पासवर टचौमेनीनं गोल केला
दुसरा गोल : इंग्लंडसाठी 54व्या मिनिटाला कर्णधार हॅरी केननं पेनल्टीवर गोल केला
तिसरा गोल : फ्रान्ससाठी 78व्या मिनटाला ग्रीजमॅनच्या पासवर जिरूडने गोल केला
The Final Four...
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 10, 2022
🇫🇷🇦🇷🇭🇷🇲🇦
सेकंड हाफमध्ये जिरूडनं हॅरी केनला टाकलं मागे
सेकंड हाफच्या सुरुवातीलाच इंग्लंडनं आपली आक्रमक खेळी दाखवत फ्रान्सवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली. त्याचा फायदा 54व्या मिनिटालाच पाहायला मिळाला. यादरम्यान फ्रान्सच्या फाऊलवर इंग्लंडला पेनल्टी मिळाली. यामध्ये इंग्लिश कर्णधार हॅरी केनने संधी सोडली नाही आणि गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.
या गोलसह हॅरी केननं इंग्लंडसाठी 53 गोल करणारा संयुक्त सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. याआधी वेन रुनीनंही इतकेच गोल केले होते. पण ऑलिव्हियर जिरूडनं हॅरी केनच्या मेहनतीवर पाणी फेरलं आणि 78व्या मिनिटाला अँटोनी ग्रीझमनच्या पासवर गोल करत जिरुडनं पुन्हा फ्रान्सला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
फर्स्ट हाफमध्ये फ्रान्सचं वर्चस्व
फर्स्ट हाफमध्येही फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात चुरशीची लढत झाली. प्रत्येक बाबतीत सामना बरोबरीत सुटला. पण फ्रान्सनं पहिल्या हाफमध्ये एक गोल करत वर्चस्व राखलं. हा गोल ऑरेलियन चौमेनीनं 17 व्या मिनिटालाच केला. या गोलला अँटोनी ग्रिजमननं मदत केली. फर्स्ट हाफमध्ये इंग्लंडकडे 58 टक्के बॉल पजेशन होता, तर फ्रान्सकडे केवळ 42 बॉल पजेशन होता. इंग्लंडनं 5 वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला, पण फ्रान्सनं केवळ तीन वेळा गोलसाठी प्रयत्न केले. ज्यात एकदा गोल करण्यात यश मिळालं.