Neymar : पर्यावरणाचे नुकसान केल्याबद्दल ब्राझीलचा फुटबाॅलपटू नेमारला भरावा लागणार 27 कोटी दंड
पर्यावरणाचे नियम तोडल्याने ब्राझीलचा फुटबाॅलपटू नेमार याला तब्बल 27 कोटी एवढा दंड भरावा लागणार आहे.
Neymar Fined For Breaking Enviornment Rules : ब्राझीलचा (Brazil) प्रसिद्ध फुटबाॅलपटू नेमार (Neymar) हा त्याच्या लग्झरी लाईफसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे करोडोंची संपत्ती आणि अनेक अलिशान गाड्या आहेत. मात्र आता नेमारला पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तब्बल 27 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. ब्राझीलच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, नेमारने रिओ दि जानेरोच्या बाहेरील हवेलीत एक बेकायदेशीर तलाव बांधला आहे. नेमारला हा दंड भरण्याकरता 20 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
मंगराटीबा येथे असणाऱ्या नेमारच्या हवेलीकत एक तलाव बांधण्यात आला आहे. ही हवेली रियो डी जानीरो (Rio Di Janerio) पासून 130 किलोमीटर अंतरावर आहे. कोणत्याही परवानगीशिवाय तलावातील पाणी खडक आणि वाळू वापरण्याबाबत तसेत तेथील झाडांचे नुकसान केल्याबद्दल नेमारवर दंड (Fine) लागू केला आहे.
सोशल मीडियावर (Social Media) पोस्टमध्ये केल्या गेलेल्या अनेक तक्रारी पाहून ब्राझीलच्या अधिकार्यांना नेमारकडून पर्यावरणाचे नियम मोडल्याचे लक्षात आले. याठिकाणी अनेक कामगार तलावाचे बांधकाम करत होते. अधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित स्थळावर उपस्थित राहून पाहणी केली आणि कामगारांना सर्व काम थांबवण्याचे आदेश दिले. ब्राझीलियन मीडियाने सांगितले की, याठिकाणी नेमारने एका अलिशान पार्टीचे आयोजन केले होते तसेच बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणी पूल पार्टी देखील करण्यात आली आहे.
Neymar has been fined nearly $3.5 million after Brazilian authorities said that the soccer star’s luxury coastal mansion in southeastern Brazil violated rules in the 'construction of an artificial lake' https://t.co/VE5RVJYSxJ pic.twitter.com/T5rdztMMER
— Reuters (@Reuters) July 5, 2023
नेमार सध्या उजव्या पायाच्या घोट्याच्या शस्त्रक्रियेतून बरा झाला आहे. मार्चमध्ये त्याने ही सर्जरी दोहा येथे करून घेतली. त्याने फेब्रुवारीपासून एकही फुटबॉल मॅच खेळलेली नाही. नेमारने 2016 मध्ये मंगरातिबा हवेली खरेदी केली होती. ब्राझिलियन मीडियानुसार, हे 10,000 चौरस मीटर (107,000 चौरस फूट) जमिनीवर स्थित आहे. तसेच या हवेलीत हेलीपॅड , जीम , स्पा यासारख्या अलिशान गोष्टी देखील आहेत. दंडाविरुद्ध अपील करण्यासाठी नेमारकडे २० दिवसांचा कालावधी आहे. मात्र सध्या या प्रकरणावर नेमारने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या