एक्स्प्लोर

World Cup 2023 : 8 संघ निश्चित, 2 जागांसाठी 6 जणांमध्ये चुरस, विश्वविजेते वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर माहिती

ICC World Cup Qualifiers 2023 Points Table : 2 स्थानासाठी झिम्बाब्वेमध्ये क्वालिफायर सामने सुरु आहेत. सुपर - 6  साठी सहा संघ पात्र ठरले आहेत. प्रत्येक संघाचे तीन तीन सामने होणार आहेत.

World Cup 2023 Qualifier Points Table : भारतात होणारा विश्वचषक राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. दहा संघामध्ये ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून रंगणार आहे. 10 संघापैकी आठ संघ निश्चित झाले आहेत. दोन स्थानासाठी झिम्बाब्वेमध्ये क्वालिफायर सामने सुरु आहेत. साखळी फेरीचे सामने झाल्यानंतर आता सुपर - 6  साठी सहा संघ पात्र ठरले आहेत. प्रत्येक संघाचे तीन तीन सामने होणार आहेत. आघाडीचे दोन संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र होतील. दोन वेळच्या विजेत्या वेस्ट इंडिजचं विश्वचषकातील आव्हान खडतर झालेय. क्वालिफायरच्या साखळी फेरीत वेस्ट इंडिजची सुमार कामगिरी झाली आहे. त्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडण्याचे संकट त्यांच्यावर ओढावले आहे.

थेट पात्र होणारे 8 संघ कोणते ?

1. न्यूझीलंड  2. इंग्लंड 3. भारत  4. ऑस्ट्रेलिया 5. पाकिस्तान 6. दक्षिण अफ्रीका  7. बांगलादेश  8. अफगानिस्तान

क्वालिफायरल सुपर 6 मध्ये कोणते संघ पोहचले ?

1. श्रीलंका 2. वेस्ट इंडीज  3. झिम्बाब्वे 4. ओमान 5. स्कॉटलँड 6. नेदरलँड

क्वालिफायरमध्ये आव्हान संपलेले चार संघ कोणते ?

1. अमेरिका  2. आयरलँड 3. यूएई  4. नेपाळ

1. सुपर सिक्समध्ये सहा संघ कसे पोहचले ?

क्वालिफायर राउंडमध्ये दहा संघामध्ये स्पर्धा रंगली होती. या दहा संघाना अ आणि ब अशा दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले होते.  या दहा संघामध्ये 20 सामने झाले. दोन ग्रुपमधील आघाडीचे तीन तीन संघ सुपर - 6 साठी पात्र ठरले आहेत. 

सुपर -6 मध्ये पोहचलेल्या संघाची गुणतालिकेतील स्थिती

संघ सामने विजय पराभूत गुण नेट रनरेट
श्रीलंका 2 2 0 4 2.638
झिम्बाब्वे 2 2 0 4 0.982
स्कॉटलँड 2 1 1 2 -0.06
नेदरलँड 2 1 1 2 -0.739
वेस्ट इंडिज 2 0 2 0 -0.35
ओमान 2 0 2 0 -3.042

2. सुपर-6 मध्ये आघाडीवर कोणते संघ ?

सुपर-6 स्टेजमध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वे  4-4 गुणांसह टॉपवर आहेत. चांगला नेटरनरेट असल्यामुळे श्रीलंकेचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे तर झिम्बाब्वेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. सुपर-6 मध्ये संघाच्या ग्रुप स्टेजमधील सामनेही ग्राह्य धरले जाणार आहेत. क्वालिफाय करणाऱ्या संघांनी एकमेंकासोबत खेळलेल्या सामन्यातील विजयानुसार गुण दिले जातात. 

झिम्बाब्वेने ग्रुप ए मध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाय करणाऱ्या वेस्ट इंडिज आणि नेदरलँड या संघाचा पराभव केला आहे. एका सामने दोन गुण मिळतात. त्यामुळे झिम्बाब्वेचे चार गुण आहेत.  स्कॉटलँड ग्रुप स्टेजमध्ये झिम्बाब्वेकडून पराभूत झाला होता पण वेस्ट इंडिजला त्यांनी हरवले होते. त्यामुळे स्कॉटलँडच्या नावावर दोन गुण आहेत. 

वेस्ट इंडीजने ग्रुप स्टेजमध्ये दोन सामने जिंकले, पण सुपर 6 मध्ये पोहचलेल्या स्कॉटलँड आणि झिम्बाब्वेकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या नावावर सध्या 0 गुण आहेत. अशाच पद्धतीने श्रीलंका, ओमान आणि नेदरलँड यांचे गुण धरले जातील. 

3. सुपर-6 मध्ये प्रत्येक संघ किती सामने खेळणार ?

सुपर सिक्समध्ये ग्रुप अ मधील संघाचा सामना ग्रुप ब मधील संघासोबत होणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये ज्या संघासोबत सामना झाला नाही, त्याच संघासोबत सामना होणार आहे. म्हणजे, प्रत्येक संघाचे तीन तीन सामने होतील. त्यानुसार, गुणतालिकेत बदल होतील. 

उदाहरण, 

झिम्बाब्वेचे तीन सामने श्रीलंका, स्कॉटलँड आणि ओमान यांच्याविरोधात होतील. नेदरलँड आणि वेस्ट इंडिजविरोधात सामना होणार नाही, कारण, साखळीफेरीतच या संघासोबत सामना झाला आहे. तसेच, श्रीलंका संघाचे तीन सामने झिम्बाब्वे, नेदरलँड आणि वेस्ट इंडिज विरोधात होतील. इतर चार संघही आपले 3-3 सामने अशाच पद्धतीने खेळेल.

4. कोणत्या दोन संघांना वर्ल्ड कपचे तिकिट मिळणार ? 

7 जुलैपर्यंत सुपर 6 स्टेजचे सामने रंगणार आहे. अखेरचा सामना हरारे येथे श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान होणार आहे. सात जुलैनंतर गुणतालिकेत आघाडीवर असणारे दोन संघामध्ये फायनल होणार आहे. 9 जुलै रोजी फायनलचा थरार होणार आहे. हे दोन संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र होतील. 

5. वर्ल्ड कपमध्ये पोहचणारा संघ कोणत्या संघासोबत लढणार?

क्वालिफायरचा अंतिम सामना जिंकणारा संघ विश्वचषकात  क्वालिफायर-1 संघ म्हणून प्रवेश करेल तर पराभूत संघ क्वालिफायर-2 म्हणून खेळेल. क्वालिफायर-1 संघाचा पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये पाकिस्तानसोबत होणार आहे. तर क्वालिफायर-2 चा पहिला सामना 7 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये दक्षिण आफ्रिकाविरोधात होणार आहे. क्वालिफायर - 1 चा भारताविरोधातील सामना 11 नोव्हेंबर रोजी तर क्वालिफायर - 2 चा सामना 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे.  

आणखी वाचा : 

Round-robin Format : राउंड रॉबिन पद्धतीने होणार यंदाचा विश्वचषक, जाणून घ्या या फॉर्मेटबद्दल संपूर्ण माहिती

World Cup 2023 : विश्वचषकाचे 10 सामने महाराष्ट्रात, भारताचे दोन सामने मुंबई-पुण्यात होणार, पाहा सविस्तर माहिती

Team India World Cup Schedule : भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत, पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

World Cup 2023 : विश्वचषकाचे वेळापत्रक एका क्लिकवर, पाहा कोणत्या मैदानावर रंगणार सामने

पाकिस्तानला झटका, अहमदाबादच्याच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार

ICC World Cup 2023 Schedule : विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत रंगणार थरार!

ICC Cricket WC 2023: विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंका - वीरेंद्र सेहवाग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget