Irani Trophy 2024 Squads : BCCIची मोठी घोषणा! CSKच्या 2 स्टार खेळाडूंना दिली कर्णधारपदाची धुरा; पृथ्वी शॉ यालाही मिळाली संधी
रणजी ट्रॉफीचा विजेता संघ आणि उर्वरित खेळाडूंना एकत्र करून रेस्ट ऑफ इंडिया टीम तयार केली जाते.
Irani Trophy 2024 Squads : इराणी ट्रॉफीसाठी बीसीसीआयने संघांची घोषणा केली आहे. इराणी ट्रॉफीत फक्त एकच सामना आहे. यामध्ये, रणजी ट्रॉफीचा विजेता संघ आणि उर्वरित खेळाडूंना एकत्र करून रेस्ट ऑफ इंडिया टीम तयार केली जाते. गेल्या वेळी मुंबई संघाने रणजी करंडक विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यावेळी मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया आमनेसामने येणार आहेत.
रेस्ट ऑफ इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे. 1 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मुंबईनेही आपला संघ जाहीर केला आहे. मुंबईची कमान अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली आहे. म्हणजेच सीएसकेच्या 2 खेळाडूंना कर्णधारपदाची धुरा दिली.
ऋतुराज गायकवाड कर्णधार तर अभिमन्यू ईश्वरन उपकर्णधार
रेस्ट ऑफ इंडियाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे देण्यात आले आहे. अभिमन्यू ईश्वरनला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुतार, सरांश जैन, प्रसिध, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद आणि राहुल चहर यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांचीही भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीसाठी निवड झाली असल्याने त्यांचे खेळणे या सामन्यावर अवलंबून आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की जर, यश आणि ध्रुव भारत विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसतील तर ते इराणी ट्रॉफी सामना खेळू शकतात, परंतु जर ते भारतासाठी खेळले तर ते इराणी ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाहीत.
अजिंक्य रहाणे मुंबईचा कर्णधार
मुंबई संघाबद्दल बोलायचे झाले तर, अजिंक्य रहाणे या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर हे खेळाडूही या संघात खेळताना दिसणार आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी कसोटी संपताच हा सामना सुरू होईल. इराणी ट्रॉफी ही देशातील प्रतिष्ठित ट्रॉफींपैकी एक आहे. त्यामुळे येथेही खेळाडूंना त्यांची सर्वोत्तम कामगिरी करायला आवडेल.
मुंबईचा संघ - अजिंक्य रहाणे ( कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अद्धातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियान, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान, रोयस्टन डायस
रेस्ट ऑफ इंडिया - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)*, इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुतार, सरांश जैन, प्रसिद्ध कृष्ण, मुकेश कुमार, यश दयाल*, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर