Ind Vs Pak Score CT 2025 : टीम इंडियाचा पाकिस्तानवर धमाकेदार विजय! थेट गाठली सेमीफायनल... किंग कोहलीने ठोकले शतक
India Vs Pakistan Score Update Champions Trophy 2025 : क्रिकेटप्रेमींसाठी आज सुपर संडे आहे, कारण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा सुपरहिट मुकाबला होणार आहे.

Background
India Vs Pakistan Champions Trophy 2025 Score : 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा शानदार प्रवास सुरूच आहे. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला आणि यासह त्यांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा 242 धावांचे लक्ष्य कोणत्याही अडचणीशिवाय गाठले. टीम इंडियाच्या विजयाचा स्टार विराट कोहली होता, ज्याने शानदार शतक झळकावून उर्वरित संघांना इशारा दिला. दरम्यान, या स्पर्धेचे आयोजन करणारा पाकिस्तान आपल्याच घरच्या मैदानावर पहिल्या फेरीत बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान हेड टू हेड
जर आपण आकडेवारी पाहिली तर भारताविरुद्ध पाकिस्तानची कामगिरी चांगली आहे. दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय स्वरूपात 136 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तान संघाने 73 सामने जिंकले आहेत, तर टीम इंडियाने 46 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील 5 सामन्यांचा निकाल लागला नाही. भारताने घरच्या मैदानावर 12 सामने, परदेशात 11 सामने आणि तटस्थ ठिकाणी 35 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, पाकिस्तान संघाने घरच्या मैदानावर 14 सामने, परदेशात 19 सामने आणि तटस्थ ठिकाणी 40 सामने जिंकले आहेत.
टीम इंडियाचा पाकिस्तानवर धमाकेदार विजय! थेट गाठली सेमीफायनल... किंग कोहलीने ठोकले शतक
भारताने पाकिस्तानचा सहा विकेट्सनी पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर पाकिस्तानचा संघ 49.4 षटकांत 241 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात, भारताने 42.3 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले.
Ind Vs Pak Live Score CT 2025 : रोमांचक मोडवर सामना! कोहली-अय्यरने पाकिस्तानला धू-धू धुतले
35 षटकांनंतर भारताने दोन विकेट गमावून 189 धावा केल्या. सध्या विराट कोहली 71 आणि श्रेयस अय्यर 48 धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये आतापर्यंत 75 धावांची भागीदारी झाली आहे. श्रेयसही आता मोकळेपणाने फलंदाजी करत आहे. त्याने चार चौकार आणि एक षटकार मारला आहे. भारताला आता 67 धावांची गरज आहे.




















