Ind vs Ban Champions Trophy : टीम इंडिया विजय पक्का? बांगलादेशने टॉस जिंकला, पण स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड, रोहित शर्मा म्हणाला...
Rohit Sharma India vs Bangladesh : चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.

India vs Bangladesh Champions Trophy 2025 Match : चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात रोहित शर्माने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनसाठी रोहितने मोठे निर्णय घेतले. रोहितने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला वगळले आहे. त्याच्या जागी हर्षित राणाला संधी मिळाली आहे. यासोबतच वरुण चक्रवर्तीचाही संघात समावेश नाही. त्याच्यापेक्षा रवींद्र जडेजाला प्राधान्य देण्यात आले. वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंत हे देखील संघात सामील झाले नाहीत.
Our Playing XI for #BANvIND 👊
— BCCI (@BCCI) February 20, 2025
Updates ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#TeamIndia |#ChampionsTrophy pic.twitter.com/pKwRfCt2MR
टॉसदरम्यान रोहित शर्मा काय म्हणाला?
नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन सांतोने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, जर आम्ही नाणेफेक जिंकला असता. तरी मी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता. आम्ही काही वर्षांपूर्वी इथे खेळलो होतो, त्यामुळे आम्हाला वाटले की चेंडू लाईटखाली चांगला येतो. दुसरीकडे निवडीसाठी सर्वजण तंदुरुस्त आहेत. आम्हाला आशा आहे की, आमची सुरुवात चांगली होईल. या स्पर्धेत प्रत्येक सामना खूप महत्त्वाचा बनतो.
प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना रोहित शर्मा म्हणाला, 'आम्ही खेळलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यापेक्षा काही बदल आहेत. वरुण चक्रवर्ती बाहेर गेला आहे, रवींद्र जडेजा आला आहे. तर, अर्शदीप सिंग बाहेर आहे आणि मोहम्मद शमी खेळत आहे.
दुबईमध्ये धावांचा पाठलाग करणे सोपे
दुबईमध्ये धावांचा पाठलाग करणे नेहमीच सोपे असते. आतापर्यंत येथे 58 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 34 वेळा विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त 22 सामने जिंकता आले आहेत. दुबईमध्ये संध्याकाळी भरपूर दव पडतो, पण गेल्या काही दिवसांत दव पडलेला नाही.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

