रंग बरसे! विराट-रोहितसह टीम इंडियाची धुळवड, व्हिडीओ व्हायरल
Indian Players Holi 2023 : विराट कोहलीसह सर्व खेळाडू रंग बरसे या गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहेत.

Indian Players Holi 2023 : देशभरात आज धुळवडीचा उत्साह दिसून आला. महाराष्ट्र, दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी पांरपरीकपणे धुळवड साजरी करण्यात आली. रंगांची उधळण करत डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसली.. देशभरात आज रंगाचा सण साजरा करण्यात आला. टीम इंडियानेही आज धुळवड साजरी केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल यांच्यासह टीम इंडियातील सर्व खेळाडू रंगांची उधळण करताना दिसत आहे. विराट कोहलीसह सर्व खेळाडू रंग बरसे या गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ
Virat Kohli and team India fully enjoying Holi. pic.twitter.com/XiognDen5G
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 7, 2023
Surya, Axar, Kishan, Kuldeep and Siraj celebrating Holi. pic.twitter.com/QWf4DhEvRN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 7, 2023
टीम इंडियातील खेळाडूंनी आज धुळवड साजरी केली. एकमेंकाना रंग लावत रंगाचा सण साजरा केला. बीसीसीआयने याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याशिवाय महिला खेळाडूंनीही रंगाचा संण उत्साहात साजरा केला. सध्या वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेदरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूसोबत विदेशी महिला खेळाडूंनीही रंगाचा सण उत्साहात साजरा केला.
#TeamIndia wishes you all a very Happy Holi 🙌🙌#HappyHoli pic.twitter.com/RdcVrNpfoB
— BCCI (@BCCI) March 7, 2023
Smriti Mandhana, Richa Ghosh and Heather Knight's celebrating Holi. pic.twitter.com/owLEvNcF54
— CricketMAN2 (@ImTanujSingh) March 7, 2023
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) फायनलमध्ये थेट स्थान मिळवण्यासाठी चौथा कसोटी सामना जिंकावा लागेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 9 मार्चपासून हा सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल्सपर्यंत पोहोचण्यासाठी काही करुन चौथ्या कसोटीत कांगारूंना चीतपट करावं लागणार आहे. तसेच, थेट 3-1 ने कसोटी मालिका आपल्या खिशात घालावी लागेल. जर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल्समध्ये पोहोचली, तर फायनल्समध्ये टीम इंडियाचा सामना पुन्हा ऑस्ट्रेलियाशी होईल. लंडनमध्ये 7 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळावली जाणार आहे.
अहमदाबादमध्ये गेल्या दोन कसोटीत टीम इंडियाची धमाकेदार खेळी
कोरोना महामारीच्या काळात अहमदाबादमध्ये सलग दोन कसोटी सामने खेळले गेले. टीम इंडियानं इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तो तिसरा सामना (डे-नाईट) दोन दिवसांत 10 गडी राखून जिंकला आणि त्यानंतर पुढील कसोटी तीन दिवसांतच खिशात घातली. ही कसोटी टीम इंडियानं एक डाव आणि 25 धावांनी जिंकली. म्हणजेच, नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले गेलेले गेले दोन कसोटी सामने टीम इंडियासाठी उत्तम होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
