एक्स्प्लोर

Hardik Pandya : रशियन मॉडेल अन् हार्दिक पाड्यांचं नातं काय? अखेर तिनेच गुपित उलगडलं; म्हणाली "मी त्याला डेट..."

Hardik Pandya Relationship: नताशा स्टॅनकोविक हिच्यासोबत हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना रशियन मॉडेलनं शेअर केलेले फोटो चर्चेत आहेत.

नवी दिल्ली : टीम इंडियाच्या टी 20 चा उपकप्तान आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya)गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic)यांच्यातील कथित घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. हार्दिक पांड्या असो किंवा नताशा स्टॅनकोविक असो दोघांनी देखील या चर्चांवर भाष्य केलेलं नाही. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये 7 धावांनी पराभव करत विजेतेपद मिळवलं होतं. या विजयानंतर हार्दिक पांड्याचे एका फोटोशूटचे फोटो व्हायरल होत आहेत. रशियन मॉडेल एलेना टुटेजा (Elena Tuteja)आणि हार्दिक पांड्यानं मागील काळात एका ब्रँड साठी फोटोशूट केलं होतं. भारतानं वर्ल्ड कप विजेतेपद मिळवल्यानंतर एलेना टुटेजानं हार्दिक सोबतचे फोटो शेअर करत पोस्ट केली होती. त्या फोटोंवरुन तर्क वितर्क सुरु झाले होते. 


एलेना टुटेजानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हार्दिक पांड्याचं अभिनंदन केलं होतं. हार्दिक पांड्या आणि एलेना टुटेजा यांनी बोल्ड अंदाजात फोटोशूट केलं होतं.  हे फोटो व्हायरल होताच हार्दिक पांड्या आणि एलेना टुटेज हे दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, रशियन मॉडेल एलेना या सर्व गोष्टींवर स्पष्टीकरण दिलं आहे.  

एलेना टुटेजाच्या पोस्टमध्ये काय होतं? 

भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर एलेना टुटेजानं हिनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये तिनं भारतीय संघाला वर्ल्ड कप विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. संपूर्ण भारत आपल्या चॅम्पियन टीम वर अभिमान व्यक्त करत आहे, अशावेळी मला एका खेळाडूसोबत केलेल्या फोटोशूटची आठवण येते. आम्ही Body X या ब्रँडसाठी फोटोशूट केलं होतं. भारतीय संघासोबत हार्दिक पांड्यानं देखील आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केल्याचं एलेना टुटेजानं म्हटलं.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Elena Tuteja Official (@ellenatutteja_official)

एलेना टुटेजानं अफवा फेटाळल्या

एलेना टुटेजा आणि हार्दिक पांड्या एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या सर्व अफवांना एलेना टुटेजानेच ब्रेक लावला आहे. वेस्ट इंडिजचे महान खेळाडू ब्रायन लारा यांना भेटल्याचे फोटो तिनं शेअर केले आहेत. तुम्हाला हे फोटो देखील फोटोशॉप वाटू शकतात.  मात्र, हे फोटो असो की हार्दिक पांड्या सोबतचे फोटो फोटोशॉप नाहीत ते खरे आहेत.सर्व फोटो खरे असून कुणालाही डेट करत नाही, लोकप्रिय लोकांसोबत काम करु लागलीय, असं एलेना टुटेजानं म्हटलं.  

संबंधित बातम्या :

रियान पराग, ध्रुव जुरेल कमबॅक करणार, शुभमन गिल कुणाला संघाबाहेर काढणार?

आता हार्दिक पांड्याच्या फोटोची रंगली चर्चा; नताशानेही साधलं टायमिंग, कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 4th T20 Highlights : सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
IND vs WI 4th T20I : वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत
वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत
IND vs WI 4th T20 : टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
IPL 2027 SRH-DC Trade : 10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget