'आय मीस यू सो मच', धनश्री वर्माच्या नव्या पोस्टची चर्चा, फोटो शेअर करत म्हणाली, आय लव्ह यू...
Dhanashree Verma Emotional Post : 'आय मीस यू सो मच', धनश्री वर्माच्या नव्या पोस्टची चर्चा, फोटो शेअर करत म्हणाली, आय लव्ह यू...

Dhanashree Verma Emotional Post : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माला घटस्फोटाचा निर्णय घेणं कदाचित सोपं नव्हतं, पण त्यांनी आता नव्या आयुष्यात रुळायला सुरुवात केली आहे. दरम्यान, धनश्री वर्माने आताच्या कठीण काळात एका खास व्यक्तीची आठवण करून देणारी नोट शेअर केली आहे. तिने तिच्या नानीला उद्देशून ही पोस्ट लिहिली आहे. धनश्रीने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केलीये. यामध्ये तिने लिहिले की,.. 'एक वर्ष झाले. नानी, मला तुझी खूप आठवण येते. माझ्या पाठिशी राहिल्याबद्दल आणि मला धैर्य दिल्याबद्दल धन्यवाद... ज्यामुळे मी सर्व आव्हानांमध्ये सन्मानाने माझे जीवन जगू शकले. तुझ्याकडून शिकण्याने आज मला खूप फायदा झाला. आय लव्ह यू...'
घटस्फोटानंतर धनश्री वर्मा प्रचंड ट्रोल
धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाच्या अफवा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होत्या. दोन्ही स्टार्सनी अफवांवर प्रतिक्रिया दिली परंतु घटस्फोटाचे स्पष्टपणे बोलणे टाळले. अलीकडेच दोघेही घटस्फोटाच्या संदर्भात न्यायालयात दिसले होते. धनश्रीने युझवेंद्रकडे पोटगी म्हणून 60 कोटी रुपयांची मागणी केल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर लोकांनी धनश्रीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले होते. मात्र, ही अफवाच असल्याचे समोर आले होते. धनश्रीच्या कुटुंबीयांनी या अफवांवर नाराजी व्यक्त करत त्याचे खंडन केले. धनश्रीच्या वकिलाने तिच्या मागील विधानात स्पष्टपणे सांगितले की, तिचा अद्याप घटस्फोट झालेला नाही, हे प्रकरण न्यायालयात आहे.
View this post on Instagram
धनश्री आणि युजवेंद्र न्यायालयात दिसले
धनश्री-युजवेंद्र यांनी कोर्टाच्या सुनावणीदरम्यान घटस्फोटाचे कारण स्पष्ट केले आणि ते गेल्या 18 महिन्यांपासून वेगळे असल्याचे उघड केले. ते एकमेकांशी सुसंगत नाहीत, त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला. युजवेंद्र आणि धनश्रीने नुकतीच एक पोस्ट शेअर करत भावनांना वाट करुन दिली होती. परंतु त्यांच्या घटस्फोटाबद्दल काहीही बोलणे स्पष्टपणे टाळत होते. दोघांनीही घटस्फोटाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
