एक्स्प्लोर
IND vs ENG : इंग्लंड क्रिकेट संघाच्या खेळाडूंना किती पगार मिळतो? टीम इंडियापेक्षा किती जास्त आहे रक्कम? जाणून घ्या.
Team India & England Cricketers Salary : टीम इंडियाचा वर्ल्ड कप 2023 मधील पुढील सामना इंग्लंडविरुद्ध आहे. या सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या पगारात काय फरक आहे.

Team India & England Cricketers Salary
1/11

इंग्लंड क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना वेगवेगळ्या स्तरावर करारबद्ध करते. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत.
2/11

त्याशिवाय, मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणाऱ्यांची श्रेणी वेगळी आहे आणि दोन्ही चेंडूंसह खेळणाऱ्यांचे करारही वेगळे आहेत.
3/11

इंग्लंडमधील जो क्रिकेटपटू लाल आणि पांढर्या दोन्ही चेंडूंनी क्रिकेट खेळतो, त्याला वार्षिक 9 लाख पौंड म्हणजेच 9.10 कोटी पगार दिला जातो.
4/11

बीसीसीआयच्या सर्वोच्च श्रेणीतील 'ए प्लस'पेक्षा ही रक्कम 2 कोटी रुपयांनी जास्त आहे.
5/11

भारतात विराट, रोहित आणि बुमराह यांसारख्या क्रिकेटपटूंना ‘ए प्लस’ श्रेणीत समाविष्ट करून वार्षिक सात कोटी रुपये मानधन दिले जाते.
6/11

इंग्लंडमधील फक्त कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना वार्षिक 6.5 लाख पौंड म्हणजे 6.55 कोटी रुपये पगार मिळतो.
7/11

बीसीसीआयच्या दुसऱ्या श्रेणीतील 'ए प्लस'पेक्षा ही रक्कम दीड कोटी रुपये जास्त आहे. भारतात ‘ए प्लस’ श्रेणीतील क्रिकेटपटूंना वर्षाला पाच कोटी रुपये मिळतात.
8/11

इंग्लंड क्रिकेट संघातील मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना 2.5 ते 3.5 लाख पौंड म्हणजेच 2.53 ते 3.54 कोटी रुपये वार्षिक वेतन दिले जाते.
9/11

बीसीसीआयच्या 'बी' आणि 'क' श्रेणीतील करार असलेल्या खेळाडूंना अनुक्रमे 3 आणि 1 कोटी रुपये वार्षिक वेतन दिले जाते. म्हणजे इथेही इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना जास्त पगार मिळतो.
10/11

मॅच फीच्या बाबतीत इंग्लंडचे खेळाडू आणि भारतीय खेळाडू जवळपास समान आहेत. इंग्लंडच्या खेळाडूंना कसोटी सामन्यासाठी 14,500 पौंड म्हणजे 14.65 लाख रुपये आणि एकदिवसीय आणि टी20 साठी 4500 पौंड म्हणजे 4.55 लाख रुपये मिळतात.
11/11

तर, भारतीय क्रिकेटपटूंना कसोटीसाठी 15 लाख रुपये, वनडेसाठी 6 लाख रुपये आणि टी-20 साठी 3 लाख रुपये मिळतात.
Published at : 28 Oct 2023 02:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
