एक्स्प्लोर
PHOTO: भारतीय महिलांनी इतिहास रचला; सातव्यांदा आशिया चषक जिंकला!
Womens Asia Cup 2022 Final: महिला आशिया चषक 2022 मधील अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा आठ विकेट्सनं धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं सातव्यांदा महिला आशिया चषकावर नाव कोरलंय.

Womens Asia Cup 2022
1/10

महिला आशिया चषकातील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
2/10

भारतीय महिलांनी त्यांचा हा निर्णय साफ चूकीचा ठरवत सुरुवातीपासून एक-एक श्रीलंकेच्या फलंदाजांना तंबूत धाडायला सुरुवात केली. श्रीलंकेच्या संघानं दुहेरी संख्या गाठण्याआधीच त्यांचे चार फलंदाज तंबूत पोहोचले होते. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
3/10

श्रीलंकेकडून ओशादी रणसिंघेनं सर्वाधिक 13 आणि इनोका रणवीरानं नाबाद 18 धावांची खेळी केली, ज्यामुळं श्रीलंकेच्या संघाला 65 धावांपर्यंत मजल मारल मारता आली. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
4/10

महिला आशिया चषका 2022 अंतिम आणि महत्वाच्या सामन्यात भारतीय महिला संघानं उत्कृष्ट गोलंदाजी केली. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
5/10

भारताकडून रेणुका सिंहनं सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर रनआऊट करण्यातही तिनं मोलाची कामगिरी केली. त्याशिवाय राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
6/10

श्रीलंकेनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर स्मृती मानधनासोबत सलामीला आलेली शेफाली वर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आऊट झाली. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
7/10

त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्जही स्वस्तात माघारी परतली. मात्र, स्मृती मानधानानं दुसऱ्या बाजूनं फटकेबाजी सुरूच ठेवली. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
8/10

स्मृती मानधनानं या सामन्यात अवघ्या 25 चेंडूत नाबाद 51 धावांची अर्धशतकीय खेळी केली. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
9/10

भारतानं हा सामना 8 विकेट्स राखून जिंकला. श्रीलंकेकडून इनोका रनावीरा आणि कविशा दिल्हारी यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
10/10

या विजयासह भारतीय महिलांनी सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं आहे. (Photo Credit: BCCI Womens Twitter Account)
Published at : 15 Oct 2022 04:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion