एक्स्प्लोर
छट पूजेसाठी गेलेले 50 लाख उत्तर भारतीय परतीच्या वाटेवर, मुंबईत ठरवणार अनेक उमेदवारांचं भवितव्य; कोणाला साथ देणार?
आपापल्या प्रदेशात छठ पूजा साजरी करायला गेलेले परप्रांतीय आता मुंबईत येण्यासाठी निघाले आहे. अवघ्या 9 दिवसात महाराष्ष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि त्यातील काही जण मतदातादेखील आहे.

Maharashtra Election Chhat Puja
1/12

कार्तिक महिन्याचा शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला छठ पूजा साजरी केली जाते. विशेषत: बिहार, उत्तरप्रदेश , झारखंडमध्ये या सणाचं विशेष महत्त्व आहे.
2/12

पारंपरिक अख्यायिकेनुसार, राम आणि सीता जेव्हा वनवासातून परतले तेव्हा त्यांनी पूजा केली होती. त्यानंतर छठ पूजा हिंदू धर्मतील एक महत्वाचा सण बनला.
3/12

छठ पूजा सूर्यदेव आणि त्यांचा पत्नीला समर्पित आहे.
4/12

हाच सण साजरा करण्यासाठी मुंबईतून अनेक परप्रांतीय आपआपल्या प्रदेशात गेले.
5/12

रेल्वे विभागाच्या माहितीनुसार पश्चिम आणि मध्य रेल्वेतून मागील महिन्याभरात 50 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी उत्तर भारतात प्रवास केला आहे.
6/12

मुंबईतून आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडला गेलेल्या लोकांना आता परतीचे वेध लागले आहेत.
7/12

कारण अवघ्या 9 (दि. 20/11/2024) दिवसांत महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे.
8/12

अनेक काळांपासून ते महाराष्ट्र राज्याचे स्थयिक असल्यामुळे ते महाराष्ट्राचे मतदार झाले आहेत. 20 तारखेपूर्वी जर ते परतले नाहीत तर त्यांना मतदानाला मुकावे लागेल.
9/12

आता इतक्या कमी कालावधीत त्यांना उत्तर भारतातून परत आणणे कठीण असल्याचे रेल्वेकडून सांगितले जात आहे.
10/12

उत्तर भारतातील प्रवाशांना परत आणण्यासाठी रेल्वेला अधिकाधिक अनारक्षित विशेष गाड्या चालवाव्या लागणार आहेत.
11/12

50 लाखांपेक्षा जास्त लोकांना आणण्यासाठी रेल्वेला जास्तीत जास्त गाड्या चालवाव्या लागतील.
12/12

त्याचसोबत 27 ऑक्टोबर 2024 बांद्रा टर्मिनस येथील पुनरावृत्ती होणार नाही याची देखील रेल्वे प्रशासनला खबरदारी घ्यावी लागेल.
Published at : 11 Nov 2024 03:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
