एक्स्प्लोर
In Pics : माहिमच्या रेतीबंदर परिसरात 'रंग'तदार होळी, परंपरा आणि नवसंस्कृतीची सांगड घालून सेलिब्रेशन
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/7b6a1ff8f9cd3cab061a5d0536696081_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Holi 2022
1/8
![जवळपास दोन वर्षानंतर सण पुन्हा उत्साहात साजरे होत आहेत. दोन वर्षांनी यंदाची होळी सगळ्यांनीच आनंदात आणि उत्साहात साजरी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/032b2cc936860b03048302d991c3498fe53b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवळपास दोन वर्षानंतर सण पुन्हा उत्साहात साजरे होत आहेत. दोन वर्षांनी यंदाची होळी सगळ्यांनीच आनंदात आणि उत्साहात साजरी केली.
2/8
![राज्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली गेली. त्यात मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी समाजात होळी तर अगदी दणक्यात साजरी केली गेली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd916670.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली गेली. त्यात मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी समाजात होळी तर अगदी दणक्यात साजरी केली गेली.
3/8
![फाल्गुन पौर्णिमेला होलिकेचे दहन करण्याची प्रथा आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या एक दिवस आधी म्हणजे होळीच्या पूर्वसंध्येला कोळी बांधव होळी दहन करतात. कोळी समाजाच्या या होळीला कोंबड होळी असं म्हणतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/8cda81fc7ad906927144235dda5fdf150026e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फाल्गुन पौर्णिमेला होलिकेचे दहन करण्याची प्रथा आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या एक दिवस आधी म्हणजे होळीच्या पूर्वसंध्येला कोळी बांधव होळी दहन करतात. कोळी समाजाच्या या होळीला कोंबड होळी असं म्हणतात.
4/8
![कोंबड होळीला मुंबईतील वरळी, माहिम, वर्सोवा, कुलाबा, जूहू अशा सगळ्या कोळीवाड्यांमध्ये वेगळाच उत्साहाचं वातावरण असतं. कोळी बांधव सुपारीच्या झाडाची होळी लावतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/156005c5baf40ff51a327f1c34f2975b6622b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोंबड होळीला मुंबईतील वरळी, माहिम, वर्सोवा, कुलाबा, जूहू अशा सगळ्या कोळीवाड्यांमध्ये वेगळाच उत्साहाचं वातावरण असतं. कोळी बांधव सुपारीच्या झाडाची होळी लावतात.
5/8
![जिथे होळी लावली जाते त्या परिसरात रांगोळी काढली जाते. पताक्यांनी होळी सजवली जाते. आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा रोषणाईने सजवला जातो. होळीवर अनेक पदार्थ सजवले जातात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/fe5df232cafa4c4e0f1a0294418e56603bd90.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिथे होळी लावली जाते त्या परिसरात रांगोळी काढली जाते. पताक्यांनी होळी सजवली जाते. आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा रोषणाईने सजवला जातो. होळीवर अनेक पदार्थ सजवले जातात.
6/8
![कोळी महिला आणि पुरुष पारंपरिक वेश परिधान करुन, नटूनथटून यावेळी पाहायला मिळतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/18e2999891374a475d0687ca9f989d83d1740.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोळी महिला आणि पुरुष पारंपरिक वेश परिधान करुन, नटूनथटून यावेळी पाहायला मिळतात.
7/8
![वरळीच्या कोळीवाड्यांमध्ये महिला मडकी डोक्यावर घेऊन संपूर्ण गावात वाजत गाजत मिरवणूक काढतात. ही मडकी डोक्यावर ऐकावर एक घेऊन त्यात दिवा लावलेला असतो आणि ही मिरवणूक काढल्यानंतर ती मडकी डोक्यावर घेऊन सगळ्या महिला होळीला पाच फेऱ्या मारुन ती मटकी होळी समोर फोडली जातात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c4880060e86.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वरळीच्या कोळीवाड्यांमध्ये महिला मडकी डोक्यावर घेऊन संपूर्ण गावात वाजत गाजत मिरवणूक काढतात. ही मडकी डोक्यावर ऐकावर एक घेऊन त्यात दिवा लावलेला असतो आणि ही मिरवणूक काढल्यानंतर ती मडकी डोक्यावर घेऊन सगळ्या महिला होळीला पाच फेऱ्या मारुन ती मटकी होळी समोर फोडली जातात.
8/8
![यावेळी सर्व कोळी बांधव होळीला देवीच्या रुपात सजवतात. तिला हळद लावून तिचा श्रृंगार केला जातो. होळी मातेची ओटी भरुन तिला नवस बोलला जातो. नंतर होळीचे दहन केले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/18/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefede06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी सर्व कोळी बांधव होळीला देवीच्या रुपात सजवतात. तिला हळद लावून तिचा श्रृंगार केला जातो. होळी मातेची ओटी भरुन तिला नवस बोलला जातो. नंतर होळीचे दहन केले जाते.
Published at : 18 Mar 2022 11:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)