DYSP Ramachandrappa Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला! 35 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल
Video DYSP Ramachandrappa : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधूगिरी शहरातील एका पीडित महिलेने जमिनीच्या वादाच्या संदर्भात तक्रार केल्याने ती डीवायएसपीच्या संपर्कात आली होती.
Video DYSP Ramachandrappa : जमिनीच्या वादातून तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला पोलिस स्टेशनच्या कार्यालयाच्या बाथरूममध्ये बोलवून लैंगिक शोषण केल्याचा 35 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कर्नाटकात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे गृहमंत्र्यांच्या मतदारसंघामध्येच ही घटना घडल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. पोलिस ठाण्यातच हा प्रकार सुरु असताना खिडकीतून व्हिडिओ केल्याने ही घटना उघडकीस आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून डीएसपीला निलंबित करून अटक करण्यात आली आहे. रामचंद्रप्पा असे या 58 वर्षीय अधिकाऱ्याचे नाव असून ते मधुगिरी येथे डीवायएसपी म्हणून तैनात होता, असे पोलिसांनी सांगितले. कथित व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी महिलेसोबत गैरवर्तन करताना आणि अनुचित वर्तन करताना दिसत आहे.
पीडित महिला जमिनीच्या वादाची तक्रार घेऊन आली होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधूगिरी शहरातील एका पीडित महिलेने जमिनीच्या वादाच्या संदर्भात तक्रार केल्याने ती डीवायएसपीच्या संपर्कात आली होती. गुरुवारी ही महिला तुमकुरू येथील रामचंद्रप्पाच्या कार्यालयात गेली असता ही घटना घडली. याठिकाणी डीएसपीने तक्रार ऐकण्यासाठी केबिनमध्ये बोलावले. त्यानंतर तो महिलेशी अश्लील बोलला. महिलेला त्याच्या केबिनशेजारील बाथरूममध्ये नेले.
#Karnataka DYSP suspended over charges of sexual assault!
— Nabila Jamal (@nabilajamal_) January 4, 2025
DYSP A Ramachandrappa of Madhugiri Sub-Division caught inappropriately involved with a woman in his chamber while in uniform. Accused of sexually assaulting a woman who visited the station for grievance redressal… pic.twitter.com/EiBB3Sajj0
डीएसपीने महिलेचे कपडे खेचले
डीएसपीने महिलेचे कपडे खेचले आणि तिच्यासोबत घाणेरडे कृत्य करण्यास सुरुवात केली. त्याच्या पँटची झिप उघडली आणि महिलेला त्याचे लिंग तोंडात घेण्यास सांगितले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला खालून वर येताच तिची नजर खिडकीतून बनवलेल्या व्हिडिओवर पडते. डीएसपी आणि महिला पळून जातात आणि व्हिडिओ बनवणारी व्यक्तीही पळून जाते.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. पावागडा शहरातील पीडित महिलेने पोलिसांशी संपर्क साधला आणि सांगितले की, पदाचा गैरफायदा घेत कृत्य करण्यास भाग पाडले. महिलेसोबत असलेल्या एका नातेवाईकाने या घटनेची गुप्तपणे रेकॉर्डिंग करून व्हिडिओ ऑनलाइन प्रसारित केल्याचा संशय आहे.
तुमकुरू गृहमंत्र्यांचा मतदारसंघ
मधुगिरी शहर तुमकुरू जिल्ह्यात येत असल्याने या घटनेने आणखी चिंता वाढवली आहे. राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वर यांच्या मतदारसंघातील हा भाग आहे. महिलेने सांगितले की, डीएसपी तिच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही आणि तिच्यासोबत चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडले. सूत्रांनी सांगितले की, डीएसपीच्या मागणीला कंटाळलेल्या महिलेने तिच्या नातेवाईकासोबत हा व्हिडिओ स्वतः बनवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या