एक्स्प्लोर

संजय राऊतांनी नाशिकची चक्रं फिरवली, ठाकरे गटात मोठे फेरबदल; सुधाकर बडगुजरांची उपनेतेपदी निवड, डी. जी. सूर्यवंशींकडे जिल्ह्याचा कारभार

Sudhakar Badgujar and D G Suryawanshi : संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची उपनेतेपदी बढती करण्यात आली आहे.

Sudhakar Badgujar and D. G. Suryawanshi : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे (Shiv Sena UBT) गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. नाशिकमधील (Nashik) ठाकरेंच्या सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील ‘डॅमेज कंट्रोल’साठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले होते. संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची उपनेतेपदी बढती करण्यात आली आहे. तर माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी (D. G. Suryawanshi) यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा फटका बसला. नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. यानंतर मागील काही दिवसात शिंदे गटाकडून ठाकरे गटाला पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने धक्के दिले जात होते. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात खासदार संजय राऊत डॅमेज कंट्रोलसाठी नाशिकमध्ये दाखल झाले होते. संजय राऊत यांच्या दौऱ्याच्या चार दिवसातच ठाकरेंच्या शिवसेनेत फेरबदल करण्यात आले आहेत.  

सुधाकर बडगुजरांची बढती

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मोर्चेबांधणी सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डी जी सूर्यवंशी यांची नाशिक जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर हे याआधी नाशिक जिल्हाप्रमुख होते. लोकसभा निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांनी चांगला प्रचार केला होता. ठाकरे गटाचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता. सुधाकर बडगुजर यांनी चांगला प्रचार केल्याने पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची बढती केली आहे. 

कोण आहेत सुधाकर बडगुजर? 

2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते. तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. 

अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद सोपविले. पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर 2012 ते 2015 अशी तीन वर्षे बडगुजर यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले. 2014 मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली यात त्यांचा पराभव झाला. 2019 साली नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांना पुन्हा एकदा संधी दिली होती. मात्र, यंदा देखील सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला. सुधाकर बडगुजर हे याआधी नाशिक जिल्हाप्रमुख होते. आता त्यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांची नाशिक जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.   

आणखी वाचा 

Pune Crime Dattatray Gade: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेचा पोलिसांच्या वेषातील फोटो सापडला, मोडस ऑपरेंडीचा उलगडा झाला

Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांच्या मंत्र्यांने स्वत:चे नग्न फोटो महिलेला पाठवले, संजय राऊतांनी नाव घेतलं, पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता रडारवर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget