एक्स्प्लोर
Saffron Water : रोज सकाळी केशरचं पाणी प्या; अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय
Saffron Water : नियमित केशरचं पाणी प्यायल्यास काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या केसांत बदल जाणवेल तसेच या पाण्यामुळे इतरही फायदे मिळतील.

Saffron Water
1/9

तुमच्या दिवसाची सुरुवात फ्रेश आणि आरोग्यदायी करायची असेल तर केशरचं पाणी हा तुमच्यासाठी अत्यंत रामबाण उपाय आहे.
2/9

केशरचा समावेश मसाल्याच्या पदार्थांमध्ये केला जातो. तर, काही जण केशरला गोडाच्या पदार्थांत वापरतात. यामुळे पदार्थाला छान चव येते. परंतु, केशरमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत.
3/9

कॉफीमध्ये कॅफीनचा वापर केला जातो. जो आपल्या शरीरासाठी घातक आहे. अशा वेळी केशरचं पाणी प्यायल्याने तुम्ही निरोगीही राहाल आणि कॉफीइतकाच हे पाणी पिऊन तुमचा दिवसही उत्साही राहील.
4/9

तुम्ही जर रोज केशरचं पाणी प्यायलात तर तुमची स्किनही तजेलदार तसेच निरोगी राहील. कारण या पाण्यात कोणतंच केमिकलयुक्त पदार्थांचा समावेश नाही.
5/9

नियमित केशरचं पाणी प्यायल्यास काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या केसांत बदल जाणवेल. तुमचे केस अधिक घनदाट होतील.
6/9

जर तुमच्या मासिक पाळीचा कालावधी कमी असेल आणि या दरम्यान पोटात वेदना होत असतील तर केशरचे पाणी प्यायल्याने वेदना कमी होण्यास आणि प्रवाह संतुलित करण्यास मदत होऊ शकते.
7/9

बुद्धीचा विकास होण्यासाठी केशर खूप महत्त्वाचे ठरते. बुद्धीचा विकास होण्यासाठी केशरमध्ये आवश्यक तेथे सर्व गुणधर्म आढळतात त्यामुळे लहान मुलांना केशर खायला दिल्यास त्यांच्या बुद्धीचा विकास होईल.
8/9

केसर ताणतणाव कमी करून बुद्धीचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खूप फायद्याचे ठरते. त्यामुळे जर तुम्हाला ताण-तणाव आल्यासारखे वाटत असेल तर दुधामध्ये केशरचे काही तंतू घालून ते दूध पिल्यास ताण-तणाव कमी होऊन फ्रेश वाटते.
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 08 Jul 2023 11:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
बीड
क्राईम
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
