एक्स्प्लोर
२५ वर्षांचा थाट मोठा, जल्लोषाला नाही तोटा, होणार मोठं सेलिब्रेशन
ZEE MARATHI AWARDS 2024: २५ वर्षांचा थाट मोठा, जल्लोषाला नाही तोटा, होणार मोठं सेलिब्रेशन

ZEE MARATHI AWARDS 2024:
1/10

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ चा रेड कार्पेट एक भव्य आणि आठवणींनी भरलेला अनुभव होता, जिथे मराठी टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील कलाकार झी मराठीच्या २५ वर्षाचा अद्भुत प्रवासाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले होते.
2/10

हा फक्त एक पुरस्कार समारंभ नव्हता, तर झी मराठीने गेल्या दोन दशकात निर्माण केलेल्या वारसाला एक हृदयस्पर्श ट्रिब्यूट होता. कलाकारांच्या आगमनासोबतच, रेड कार्पेट रंगांच्या आणि शैलीच्या विविधतेने भरलेला होता.
3/10

पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखांपासून आधुनिक फॅशनपर्यंत, कलाकारांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली, जे झी मराठीच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचे आणि आधुनिकतेचे प्रतिनिधित्व करते.
4/10

खूप उत्साही वातावरणात कलाकार, एकमेकांना भेटत होते, त्यांच्या आठवणींना उजाळा देत होते. यावर्षीचे पुरस्कार विशेष होते कारण, ते झी मराठीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होते.
5/10

झी मराठीने, गेली दोन दशकं मराठी संस्कृती आणि परंपरा जपण्यात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे आणि हे वाहिनीवर प्रसारीत झालेल्या मालिकांमधून पाहायला मिळते.
6/10

झी मराठी अनेक कलाकार आणि निर्मात्यांसाठी एक व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात धमाकेदार परफॉर्मन्स असणार आहेतच सोबत हृदयस्पर्शी आठवणींचा देखील समावेश असणार आहे.
7/10

२५ वर्षांचा अभिमान मोठा, कलाकारांचा जल्लोष मोठा, प्रेमाचे क्षण मोठे, वया पेक्षा तारुण्य मोठं, साठलेल्या भावना मोठ्या, २५ वर्षांचा थाट मोठा, जल्लोषाला नाही तोटा.
8/10

या वर्षीचा झी मराठी अवॉर्ड्स २०२४ हा खऱ्या अर्थाने अनेक सर्प्राइझेस ने भरलेला असणार आहे.
9/10

२५ वर्षांच्या सोहळ्याला एक दिवस थोडीच पुरणार, २६ आणि २७ ऑक्टोबरला सेलिब्रेशन मोठ्ठ होणार संध्या ७:०० वा. पासून फक्त झी मराठी वाहिनीवर.
10/10

तेव्हा घरबसल्या अनुभवयाला विसरू नका हा भव्य सोहळा फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर.
Published at : 21 Oct 2024 03:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बीड
क्रीडा
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion