एक्स्प्लोर
सलमानचा शेरा नाहीतर, 'हा' बॉलिवूडचा सर्वाच महागडा बॉडीगार्ड; पगार ऐकाल तर, विश्वास बसणार नाही...
Bollywood Bodyguard: अनेक बॉलिवूड स्टार्स त्यांच्या सुरक्षेसाठी सोबत बॉडीगार्ड असतात. जेणेकरुन त्यांना कोणत्याही कार्यक्रमात किंवा शुटिंगमध्ये कोणतीही अडचण येऊ नये.

Bollywood Celebrity Bodyguard
1/11

आज आम्ही तुम्हाला बी-टाऊनच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बॉडीगार्डची ओळख करून देत आहोत.
2/11

आता जर तुम्ही विचार करत असाल की, हा बॉडिगार्ड म्हणजे, सलमान खानचा अगदी जवळचा मित्र आणि बॉडीगार्ड शेरा आहे, तर तुमचा हा अंदाज अत्यंत चुकीचा आहे. जाणून घ्या, कोणत्या अभिनेत्याच्या बॉडीगार्डला सर्वाधिक फी मिळते?
3/11

बॉलिवूडचा सर्वात महागडा बॉडीगार्ड सोबत ठेवणारा सेलिब्रिटी सलमान खान नाही तर, शाहरुख खान आहे. जो इंडस्ट्रीमध्ये आपल्या बॉडीगार्डला सर्वात जास्त पगार देतो. शाहरुखच्या बॉडीगार्डचं नाव रवी आहे. जो 10 वर्षांपासून अभिनेत्यासोबत आहे.
4/11

शाहरुख खान त्याचा बॉडीगार्ड रवीला दरवर्षी 3 कोटी रुपयांचं पॅकेज देतो. त्यानुसार, रवी दरमहा 25 लाख रुपये पगार घेतो.
5/11

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आपले खास मित्र बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूनंतर फारच त्रस्त आहे. त्याचबरोबर अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकीही दिली जात आहे.
6/11

अशा परिस्थितीत त्याचा बॉडीगार्ड शेरा कायम सावलीसारखा अभिनेत्यासोबत राहतो.
7/11

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, शेरा गेल्या 29 वर्षांपासून सलमान खानसोबत आहे. अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी त्याला दरवर्षी 2 कोटी रुपये मानधन मिळतं. म्हणजेच, शेरा दर महिन्याला सुमारे 15 लाख रुपये कमावतो.
8/11

युवराज घोरपडे हा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा बॉडीगार्ड आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता त्याला दरवर्षी 2 कोटी रुपये फी देतो.
9/11

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डबद्दल बोलायचं झालं तर त्याचं नाव जितेंद्र आहे. बिग बी त्यांना दरवर्षी 1.5 कोटी रुपये देतात.
10/11

अक्षय कुमार त्याचा बॉडीगार्ड श्रेयस थेलेला दरवर्षी 1.2 कोटी रुपये फी देतो. त्याच्याशिवाय तो अभिनेत्याचा मुलगा आरव याचाही बॉडिगार्ड म्हणून काम करतो.
11/11

(वरील माहिती आम्ही केवळ मीडिया रिपोर्ट्सनुसार देत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही)
Published at : 30 Oct 2024 09:04 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
भविष्य
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
