एक्स्प्लोर
महिलांना अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जाण्यास मज्जाव का करतात? जाणून घ्या, 5 कारणं
Shamshan Ghat: हिंदू धर्मात अंतयात्रा काढून प्रेत स्मशानात नेलं जातं आणि तिथे अंत्यसंस्कार केले जातात. पण हिंदू धर्मातील विविध जातींमध्ये अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीत महिला जात नाहीत. कारण काय?

Why didnt women go to Shamshan Ghat
1/10

समाजातील समजुतींनुसार, हिंदू धर्मातील काही जातींमध्ये स्मशानभूमीत स्त्रिया जात नाहीत. यासाठी एक कारण सांगितलं जातं. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असतात. कुटुंबातील व्यक्तीचं निधन झाल्यानंतर घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो.
2/10

मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेत सहभागी होणं महिलांसाठी अत्यंत क्लेशदायक असतं. अशा परिस्थितीत स्मशानभूमीतील दुःखी, नकारात्मक वातावरण महिला सहन करू शकत नाही. त्यामुळेच हिंदू धर्मातील काही जातींमध्ये महिला अंत्ययात्रेत सहभागी होत नाहीत, तसेच, अंत्ययात्रेसोबत स्मशानातही जात नाहीत.
3/10

सामान्य समजुतीनुसार स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असतात. कुटुंबातील कोणाचे निधन झाल्यास घरात आनंदाचे वातावरण असते. शेवटच्या प्रवासात मृतदेह नेणे हे महिलांसाठी अत्यंत क्लेशदायक असते. अशा परिस्थितीत स्मशानभूमीतील वेदना महिलांना सहन होत नाही. त्यामुळेच त्यांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
4/10

हिंदू धर्मातील मान्यतांनुसार, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला आपलं मुंडन करावं लागतं. हिंदू संस्कृतीत महिलांनी आपले केस काढणं अशुभ मानलं जातं. म्हणून महिलांना अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जाण्याची परवानगी नसते, असं बोललं जातं.
5/10

यासंदर्भात आणखी एक मान्यता अशी आहे की, कुटुंबातील सदस्याचं निधन झाल्यानंतर ज्यावेळी प्रेत अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेलं जातं, त्यावेळी घर बंद करणं अशुभ मानलं जातं. कारण, गुरुड पुराणानुसार, व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा आत्मा 10 दिवसांपर्यंत घरातच राहतो.
6/10

अंत्यसंस्कारानंतर ज्यावेळी पुरूष मंडळी घरी परततात, त्यावेळी ते आंघोळ करुनच घरात प्रवेश करतात. आणि त्याआधी घराची स्वच्छता करण्यासाठी महिलांना घरातच राहावं लागतं, अशी देखील मान्यता असल्याचं सांगितलं जातं.
7/10

त्याचप्रमाणे आणखी एक मान्यता अशीदेखील आहे की, स्मशानभूमीत नकारात्मक ऊर्जा खूप असते. दुःखद वातावरणात स्त्रिया स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकत नाही. त्यांच्यावर आसपासच्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम लगेच होतो. यामुळेच महिला अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीत जात नाहीत.
8/10

हिंदू धर्मातील मान्यतांनुसार, स्मशानभूमीतील वातावरण अत्यंत नकारात्मक असते. अनेकजण स्मशानभूमीत जाणं अपवित्र असल्याचंही मानतात. या नकारात्मक वातावरणामुळे मनावर परिणाम होऊन आजारी पडण्याचीही शक्यता असते, त्यामुळे महिला अंत्यसंस्कारावेळी स्मशानात जात नाहीत.
9/10

हिंदू धर्मातील काही जातींमध्ये महिला स्मशानात जात नाहीत. पण, काही जातींमधील महिला अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीत जातात. पण, अंत्यसंस्काराच्या विधी त्या करत नाहीत.
10/10

(महत्त्वाची टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. वर सांगण्यात आलेल्या सर्व गोष्टी या केवळ ऐकीव मान्यतांवरुन देण्यात आल्या आहेत. यावरुन एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 03 Sep 2024 01:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion