एक्स्प्लोर
Advertisement
स्काय डाईव्हर शीतल महाजनांच्या मोदींना 'आभाळभर' शुभेच्छा
13 हजार फुटांवरुन उडी मारुन स्काय डाईव्हर शीतल महाजनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 68 व्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.
मुंबई : स्कायडाईव्हर शीतल महाजन यांनी पुन्हा एकदा 13 हजार फूट उंचीवरुन उडी घेतली. आकाशातूनच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 68 व्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. काल म्हणजेच 17 सप्टेंबरला अमेरिकेतील शिकागोत त्यांनी 13 हजार फूट उंचीवरुन स्काय डाईव्हिंग केलं.
तिरंगी कपडे परिधान केलेल्या शीतल महाजन यांनी विमानातून उडी घेतल्यानंतर हातात मोदी यांना वाढदिवसाचं शुभेच्छापत्र धरलं होतं. त्या सध्या अमेरिकेच्या राष्ट्रीय स्कायडायव्हिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शिकागोला गेल्या आहेत.
शीतल महाजन यांना अद्याप नरेंद्र मोदी यांची भेट घेता आलेली नाही. गेल्या चार वर्षांपासून त्या मोदींना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना कोणतंही उत्तर आलेलं नाही. त्यामुळेच मोदींच्या वाढदिवसानिमित्त शीतल महाजनांनी अनोख्या शुभेच्छा दिल्या.
पॅराजम्पिंग सारख्या साहसी खेळात शीतल महाजन यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. स्काय डायव्हिंगमध्ये 18 राष्ट्रीय आणि 6 जागतिक विक्रम करणारी पहिली भारतीय महिला असण्याचा मान त्यांनी पटकावला आहे.
यापूर्वी, भारताच्या स्वातंत्र्यदिनी फिनलंडमध्ये तिरंगा घेऊन महाजन यांनी 5 हजार फूट उंचीवरुन विमानातून उडी मारली होती. तर थायलंडमधील स्काय डायव्हिंग सेंटरमध्ये 13 हजार फुटांवरुन नऊवारी साडी नेसून शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement