एक्स्प्लोर

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या साडे पाच वर्षांच्या चिमुकल्याचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झालाय.

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये उपचारासाठी नेलेल्या साडेपाच वर्षांच्या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शासकीय रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 6 डॉक्टरांवर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात (Pundliknagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे चिमुकल्याचा मृत्यू 24 एप्रिल 2024 रोजी झाला असताना, डॉक्टरांनी (Doctor) त्याला 11 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले होते. हा धक्कादायक प्रकार गारखेड्यातील वेदांत बाल रुग्णालयात घडला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या साडे पाच वर्षांच्या चिमुकल्याला 20 एप्रिल रोजी खाजेचा त्रास होत असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी बाळाला फायमोसीस विथ पिनाईल टॉर्नन हा आजार झाल्याचे सांगून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 25 एप्रिलला बाळाला ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला डॉक्टरांनी 20 ते 25 मिनिटात ऑपरेशन होईल, असे सांगितले होते. मात्र 45 मिनिटं होऊन देखील ऑपरेशन झाले नव्हते. तासाभराने डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि त्यांनी ऑपरेशन चांगलं झाल्याची माहिती चिमुकल्याच्या कुटुंबियांना दिली. एका डॉक्टरांनी बाळाला स्पाईनमध्ये भूल दिली होती. परंतू बाळाने मध्येच हात हलविल्यामुळे त्याला पुन्हा झोपेचे इंजेक्शन द्यावे लागले. त्यामुळे बाळ सध्या बेशुद्ध असल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले. त्यानंतर 6 मेपर्यंत त्याच्यावर आयसीयूमध्येच उपचार सुरू होते. 6 मे रोजी त्याला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.

6 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल 

आता याप्रकरणी शासकीय रुग्णालय असलेल्या घाटीतील समितीने अहवाल दिल्यानंतर 6 डॉक्टरांवर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये डॉ. अर्जुन पवार, डॉ. शेख इलियास, डॉ. अजय काळ, डॉ. अभिजीत देशमुख, डॉ. तुषार चव्हाण आमि डॉ. नितीन अधाने यांचा समावेश आहे.  चिमुकल्याचा मृत्यू 24 एप्रिल 2024 रोजी झाला असताना डॉक्टरांनी त्याला 11 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्याचे उघड झाले आहे. 

पोलीस उपायुक्तांची प्रतिक्रिया

दरम्यान, बाळाच्या कुटुंबीयांकडून एप्रिल महिन्यात तक्रार आली होती, त्यांनी रुग्णालयावर आरोप केले होते. त्यांना आम्ही कायदेशीर तक्रार करण्यासाठी सांगितले. त्यांच्या तक्रारीनंतर सर्व कागदपत्रे आम्ही शासकीय रुग्णालयात पाठवले. त्यांनी दिलेल्या अहवालनुसार आम्ही 6 डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्याबाबत पुढील तपासानुसार निर्णय घेण्यात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवणीत कावत यांनी दिली आहे. 

आणखी वाचा

परप्रांतीय व्यक्तिकडून आईसह मुलीला बेदम मारहाण, सर्व घटना  CCTV कॅमेऱ्यात कैद, विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule News : अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
Sanjay Raut on Disha Salian Case : दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 28 March 2025Disha Salian case : वडिलांच्या अफेअरने त्रस्त, दिशा सालियनने आर्थिक तणावातून जीवन संपवलं, नवीन माहिती समोरABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 28 March 2025Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर नावावरून वाद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule News : अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
Sanjay Raut on Disha Salian Case : दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
Dhananjay Munde & Chhagan Bhujbal : धनंजय मुंडेंना अजितदादांनी चार हात लांबच ठेवलं, छगन भुजबळांपासूनही अंतर राखलं; विधिमंडळ समित्यांच्या नियुक्तीवरून चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंना अजितदादांनी चार हात लांबच ठेवलं, छगन भुजबळांपासूनही अंतर राखलं; विधिमंडळ समित्यांच्या नियुक्तीवरून चर्चांना उधाण
IPL 2025 SRH Vs LSG: केशरी कळी खुललीच नाही, बिचारी काव्या मारन शेवटपर्यंत रडवेल्या चेहऱ्याने बसून राहिली; लखनऊने हैदराबादला लोळवलं
केशरी कळी खुललीच नाही, बिचारी काव्या मारन शेवटपर्यंत रडवेल्या चेहऱ्याने बसून राहिली; लखनऊने हैदराबादला लोळवलं
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ अखेर समोर आले, त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ अखेर समोर आले, त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?
Kunal Kamra & Sushma Andhare : मोठी बातमी : कुणाल कामरा, सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला; आजच नोटीस धाडण्याची शक्यता, दोघांच्या अडचणी वाढणार?
कुणाल कामरा, सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला; आजच नोटीस धाडण्याची शक्यता, दोघांच्या अडचणी वाढणार?
Embed widget