SCO Foreign Ministers Meet: 'दहशतवादाला समर्थन दिले जाऊ शकत नाही', शांघाय सहकार्य परिषदेत भारताची भूमिका
SCO Foreign Ministers Meet: शांघाय सहकार्य परिषद ही गोव्यात पार पडत आहे. तिचे अध्यक्षपद यंदा भारत भूषवत आहे.
![SCO Foreign Ministers Meet: 'दहशतवादाला समर्थन दिले जाऊ शकत नाही', शांघाय सहकार्य परिषदेत भारताची भूमिका SCO foreign minister meeting held in goa this year india foreign minister said terrorism in not justified detail marathi news SCO Foreign Ministers Meet: 'दहशतवादाला समर्थन दिले जाऊ शकत नाही', शांघाय सहकार्य परिषदेत भारताची भूमिका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/05/207899ec7c6148317dd504877bd351be1683268532545720_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
SCO Foreign Ministers Meet: यंदा होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदचे (SCO Meeting) अध्यक्षपद भारत भूषवणार असून ही बैठक आजपासून (5 मे) रोजी सुरु झाली आहे. ही परिषद गोव्यात (Goa) आयोजित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत शांघाय सहकार्य परिषदेच्या संरक्षण मंत्र्यांची (Foreign Ministers Meeting) बैठक झाली. तसेच यावर्षी शांघाय सहकार्य परिषदेची शिखर परिषद होणार नाही.
सध्या शांघाय सहकार्य परिषदचे आठ सदस्य आणि तीन निरीक्षक आहेत. या बैठकीत कुवेत, यूएई, म्यानमार आणि मालदीव या देशांना संवाद भागीदार बनवण्याच्या प्रस्तावावरही विचार केला केला जाणार आहे. रशिया युक्रेनचे युद्ध तसेच अफगाणिस्तानमधील बिघडत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही शांघाय सहकार्य परिषद आयोजित करण्यात आली आहे.
तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांकडून 15 करार केले जातील आणि त्यावर स्वाक्षरी देखील केली जाईल. तसेच पाकिस्तान परराष्ट्र मंत्री बिलावल भूट्टो हे देखील या परिषदेसाठी गोव्यात पोहोचले आहेत.
या परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादावर देखील चर्चा केली. तसेच दहशतवादाला कोणत्याही पद्धतीचे समर्थन दिले जाऊ शकत नाही अशी भूमिका पराराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मांडली. तसेच दहशतवाद पूर्णपणे संपायला हवा, असे मत देखील मांडले. त्याचप्रमाणे दहशतवादाला कोणत्याही प्रकारचे साहाय्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करायला हवी असे देखील एस.जयशंकर यांनी म्हटलं आहे.
'दहशतवादाविरुद्ध लढणे हे एससीओ स्थापन करण्यामागील महत्त्वाचे कारण आहे', असे देखील एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. तसेच या परिषदेसाठी चीनचे परराष्ट्र मंत्री किंग गँग, रशियाचे सर्गेई लॅवरॉन तसेच पाकिस्तानचे परारष्ट्रमंत्री बिलावल भूट्टो हे देखील उपस्थित होते.
तसेच, जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री किन यांनी येणाऱ्या G20 आणि BRICS बैठकीबाबतही चर्चा केली. जेव्हा मार्चमध्ये किन हे G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी आले होते, तेव्हा दोन्ही मंत्र्यांनी बैठक घेतली होती. तेव्हा भारताने त्यांना सांगितले होते की, भारत आणि चीनच्या सीमेवरील परिस्थिती ही चिंताजनक आहे. तसेच, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितले होते की, 'सीमेवरील नियमांचे चीन उल्लंघन करत आहे, त्यामुळे सीमेलवर तणावाचे वातावरण बिघडत चालले आहे'.
शांघाय सहकार्य परिषदेत भारताची भूमिका
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी म्हटले की, 'जगभरात अनेक गोष्टी घडत आहेत ज्याचा परिणाम जागाच्या व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे जागतिक व्यवस्थेत अन्न, आणि उर्जेचा पुरवठा विस्कळीत होत आहे. यावर काम करायला हवे'. युक्रेन युद्धाबाबत रशिया आणि पाश्चात्य देशांमध्ये तणाव असताना तसेच चीनने सध्या घेतलेली विस्तारवादाची भूमिका असताना या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या परिषदेवर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
Comprehensive review of our bilateral, global and multilateral cooperation with FM Sergey Lavrov of Russia.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 4, 2023
Appreciated Russia’s support for India’s SCO presidency. Also discussed issues pertaining to G20 and BRICS. pic.twitter.com/cgfhATd8D4
महत्त्वाच्या इतर बातम्या :
उत्तराखंड जोशीमठजवळ दरड कोसळली, बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे ठप्प; बद्रीनाथमधले हजारो पर्यटक अडकले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)