एक्स्प्लोर
भारतीय वंशाच्या डेंटिस्ट तरुणीची ऑस्ट्रेलियात हत्या, एक्स-बॉयफ्रेण्डचाही कार अपघातात मृत्यू
कारमधील एका सूटकेसमध्ये प्रिती रेड्डीचा मृतदेह आढळला. प्रितीच्या मृतदेहावर अनेक वेळा भोसकल्याच्या खूणा आढळल्या आहेत.

कॅनबेरा : भारतीय वंशाच्या डेंटिस्ट तरुणीची ऑस्ट्रेलियात निर्घृण हत्या करण्यात आली. 32 वर्षीय प्रिती रेड्डीचा मृतदेह सिडनी शहरात तिच्याच कारमधील एका सूटकेसमध्ये आढळला. विशेष म्हणजे तिच्या एक्स बॉयफ्रेण्डचाही कार अपघातात मृत्यू झाला.
प्रिती गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिला मॅकडॉनल्ड्सबाहेर वाट पाहताना रविवारी अखेरचं पाहिलं गेलं होतं. रविवारी तिचं घरच्यांशी फोनवर बोलणं झालं होतं. मात्र ती परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांना तिची कार मंगळवारी किंग्जफोर्ड भागात पार्क केलेली आढळली. कारमधील एका सूटकेसमध्ये तिचा मृतदेह आढळला. प्रितीच्या मृतदेहावर अनेक वेळा भोसकल्याच्या खूणा आढळल्या आहेत.
सिडनीतील एका हॉटेलमध्ये ती आणि तिचा एक्स-बॉयफ्रेण्ड राहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तिचा एक्स-बॉयफ्रेण्डही डेंटिस्ट होता. सोमवारी रात्री दहा वाजता त्याचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
मुंबई
गोंदिया
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
