शपथविधीआधी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा, अडल्ड स्टारसोबत संबंध ठेवल्याचं प्रकरण
Hush Money Case : डोनाल्ड ट्रम्प यांची हश मनी प्रकरणातील सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता त्यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Donald Trump Hush Money Case : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शपथविधीआधी मोठा दिलासा मिळाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना हुश मनी प्रकरणात न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने ट्रम्प यांची हश मनी प्रकरणातील सर्व 34 आरोपांमधून बिनशर्त मुक्तता केली आहे. यासोबतच न्यायालयाने त्यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
10 दिवसांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार
अमेरिकेत न्यायमूर्ती जुआन मर्चेन यांनी शुक्रवारी 10 जानेवारी रोजी या प्रकरणावर निकाल दिला. अमेरिकेतील मॅनहॅटन क्रिमिनल कोर्टात शिक्षेच्या सुनावणीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. या प्रकरणात ट्रम्प दोषी आढळले मात्र, तरीही न्यायालयाने त्यांना कोणतीही शिक्षा सुनावलेली नाही. न्यायालयाने या प्रकरणातून ट्रम्प यांची मुक्तता केली आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प लवकरच दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षाची शपथ घेणार आहे. 10 दिवसांनंतर डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काय आरोप होते?
2016 मध्ये ट्रम्प यांच्यावर स्कँडलपासून वाचण्यासाठी एका अडल्ट स्टारला 1 लाख 30 हजार डॉलर्स दिल्याचा आरोप होता. ट्रम्प यांनी पॉर्न स्टार डैनियल्स हिला तोंड बंद ठेवत त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप होता. गेल्या वर्षी मे महिन्यात ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले होते. आता आज अखेर त्यांना या आरोपातून मुक्त करण्यात आले आहे. दोषी आढळल्यानंतरही न्यायालयाने त्यांना कोणतीही शिक्षा सुनावलेली नाही. निकाल देताना न्यायाधीश मर्चेन यांनी या प्रकरणात मोठा विरोधाभास असल्याचं म्हटलं आहे.
अडल्ट स्टारसोबत संबंध ठेवल्याचा आरोप
दरम्यान, आपल्या बचावात ट्रम्प यांनी म्हटलं की, त्यांनी असं कोणतंही चुकीचं कृत्य केलेलं नाही. ते निवडणूक जिंकू नयेत, यासाठी निवडणुकीपूर्वी त्यांच्याविरुद्ध हे षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा ड्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना गेल्या वर्षी मे महिन्यात दोषी ठरवण्यात आले. पॉर्न स्टार डॅनियल्सने दावा केला होता की, तिचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी शारीरिक संबंध होते आणि ही वस्तुस्थिती लपवण्यासाठी ट्रम्पने तिला 1 लाख 30 हजार डॉलर्स दिले होते.
BREAKING: Donald Trump has been sentenced "unconditional discharge," meaning his conviction of 34 felonies is now official, but he will not receive prison time.
— Really American 🇺🇸 (@ReallyAmerican1) January 10, 2025
He will, however, be the first President in history to enter the Oval Office as a convicted felon.
What a disgrace. pic.twitter.com/1j16mESLBg
महत्त्वाच्या इतर बातम्या :