Taiwan Earthquake: तैवानमध्ये 24 तासांत 100 भूकंपाचे धक्के, जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
Taiwan Earthquake: तैवानमध्ये रविवारी पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. येथे गेल्या 24 तासात 100 हुन अधिकवेळा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत.
Taiwan Earthquake: तैवानमध्ये (Taiwan) रविवारी पुन्हा एकदा भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. येथे गेल्या 24 तासात 100 हुन अधिकवेळा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर (Richter scale) 7.2 एवढी होती. हा भूकंप तैवानपासून 85 किमी पूर्वेला दुपारी 12.14 वाजता जाणवल्याची माहिती आहे. तसेच तैवानच्या किनारपट्टीवर 7.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसल्यानंतर जपानने (Japan) सुनामीचा (Tsunami) इशारा देण्यात आला आहे.
⚡️ A video of eyewitnesses with the consequences of an earthquake near the coast of Taiwan appeared on the network. Trains swayed on the tracks, and residential buildings collapsed in some areas. pic.twitter.com/op0NYsQIsL
— FLASH (@Flash_news_ua) September 18, 2022
सरकारमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. लोकांनी घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ते म्हणाले, भूकंपामुळे दक्षिणेकडील काओशुंग शहरातील मेट्रो सेवा बराच काळ प्रभावित झाली होती. तैवान रेल्वे प्रशासनाने Hualien आणि Taitung ला जोडणाऱ्या गाड्या तात्पुरत्या थांबण्यात आल्या आहेत. यासोबतच हायस्पीड रेल्वे सेवाही रद्द करण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू ताइतुंग काउंटीच्या उत्तरेला असल्याचे सांगण्यात आले आहे.
Multiple strong #earthquakes destroyed #Hualien County in #Taiwan on Sunday.
— Chaudhary Parvez (@ChaudharyParvez) September 18, 2022
The most devastating one measured 7.2-magnitude.
Tsunami alerts have been issued in Japan's #Miyakojima and #Yaeyama regions. pic.twitter.com/vUO1LIyRVe
BREAKING - Several Apartments & House have reportedly collapsed following the 7.2 Magnitude Earthquake, in Taiwan. pic.twitter.com/GV9W0Y0sZj
— Anonymous Operations (@AnonOpsSE) September 18, 2022