एक्स्प्लोर

Wardha News : वर्ध्यात शालेय पोषण आहाराचा काळाबाजार, विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावणाऱ्यांचा पर्दाफाश, पोलिसांची कारवाई

Wardha News : वर्ध्यात शालेय पोषण आहारातील धान्याचा काळाबाजार करणाऱ्या जिल्ह्यातील धान्य चोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

वर्धा : शाळकरी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराचे (school nutrition) शोषण करणारा काळा बाजार वर्ध्यात (Wardha) उघडकीस आला आहे. शालेय पोषण आहारातील धान्याचा काळाबाजार करणाऱ्या जिल्ह्यातील धान्य चोरांच्या पोलिसांनी  मुसक्या आवळल्यात. दरम्यान या टोळीला सेवाग्राम पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शालेय पोषण आहारातील या गैर प्रकाराने वर्ध्यात खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणात व्यापाऱ्यांसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच पोलिसांनी वाहनांसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल देखील जप्त केलाय. 

या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकूण 8 लाख 69 हजार 810 रुपयांचा धान्यसाठा देखील पोलिसांनी जप्त केलाय. किशोर नारायण तापडीया रा. एसटी डेपोजवळ, रामनगर, विनोद बबन भांगे रा. बोरगांव(मेघे), शेख रहीम शेख करीम रा. स्वस्तिक नगर, सावंगी(मेघे), अंकीत सतिश अग्रवाल रा. मुर्तिजापूर, अकोला  यांच्यासह इतरांवर कारवाई करण्यात आलीये. या घटनेमुळे संपूर्ण वर्ध्यात एकच खळबळ माजली. 

पोलिसांची कारवाई

सेवाग्राम पोलिसांनी  वाहनचालक विनोद भांगे यास वाहनासह ताब्यात घेतले.यावेळी त्याच्या वाहनात अवैधरीत्या 25 क्विंटल तांदूळ आढळून आलेत. त्याला पोलिसांनी आपला इंगा दाखवताच त्याने हा तांदूळ एमआयडीसी परिसरातील किशोर तापडीया यांच्या गोडाऊनमधून खरेदी केल्याचे सांगितले. तसेच सदर तांदूळ सांवगी(मेघे) येथील धान्य तस्कर शेख रहीम शेख करीम याला विकणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. किशोर तापडीया हा जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुरवठा करणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करीत असल्याची माहिती यावरून समोर आलीय. याबाबत शिक्षण विभाग हा अनभिज्ञ होता काय? असाच प्रश्न उपस्थित होतोय.

विद्यार्थ्यांसाठीचा शालेय पोषण आहार

शाळकरी विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणात पोषण मिळावे यासाठी सरकारकडून शालेय पोषण आहाराची तरतूद करण्यात आलीये. पण याच पोषण आहारात आता काळाबाजार होत असल्याने अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. दरम्यान याच पोषणा आहाराचा काळाबाजार होत असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या प्रकरणात आता पोलीस कोणती कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. तसेच यामध्ये आणखी कोणाची नावं पुढे येणार हे पाहणं देखील गरजेचं ठरणार आहे. 

हेही वाचा : 

Thane Crime : 80 किमी अंतराचे सीसीटीव्ही तपासले, खबऱ्यांचे नेटवर्क वापरले, महिलांचे दागिने चोरणाऱ्या इराणी टोळीतील चोरांना अखेर बेड्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तश्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तश्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला
चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला लाखमोलाचा सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 Superfast News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 27 March 2025 : 6 PmAjit Pawar on Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी द्यायचा याचा योग्यवेळी निर्णय घेईल- अजित पवारABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 27 March 2025MNS Banners : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, उद्धव ठाकरे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तश्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तश्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला
चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला लाखमोलाचा सल्ला
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
Embed widget