एक्स्प्लोर

Thane Crime : 80 किमी अंतराचे सीसीटीव्ही तपासले, खबऱ्यांचे नेटवर्क वापरले, महिलांचे दागिने चोरणाऱ्या इराणी टोळीतील चोरांना अखेर बेड्या

Thane Kalva Crime : कळवा पोलिसांनी अटक केलेल्या दोन चोरांनी या आधीच नाशिक महामार्गावरील अशा प्रकारचे सहा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. 

ठाणे : दिवाळी सणाच्या कलावधीत वृद्ध महिलेला टार्गेट करत सोनसाखळी खेचणार्‍या इराणी टोळीतील दोन सराईत चोरट्यांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे. या चोरांना अटक करण्यासाठी तब्बल 80 किमीचा मागोवा घेणारे सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांनी तपासले. या चोरांनी आधीच अशा प्रकारचे सहा गुन्हे केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून 70 ग्रॅम सोन्याचे दागिने असा 5 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवाळी सणाच्या काळात 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास कळव्यातील विठ्ठल मंदिराबाहेर एका 65 वर्षीय वृद्ध महिलेचे दागिने हेल्मेट घातलेल्या दोन दुचाकीवरील चोरांनी पोबारा केल्याची तक्रार दाखल झाली. सदर घटनेनंतर घटनास्थळावरून सीसीटीव्हीचे फुटेज मिळवत तब्बल 80 किमीच्या प्रवासाचा तांत्रिक अभ्यास करून दोघा आरोपीपर्यंत पोलीस पोहचले. 

खबऱ्यांच्या नेटवर्कचा वापर 

गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकींचा नंबर आणि सीसीटीव्ही फुटेज हे पारसिक खारेगाव, टोलनाका, कल्याण फाटा, वदप, पडघा, वशिंड, शहापूर आणि खर्डी कसारापर्यंत सीसीटीव्हीच्या चित्रांवरून मागोवा काढला. त्यानंतर खबऱ्यांच्या नेटवर्कचा वापर करीत 13 दिवसानंतर दखलन गाव, ता. खर्डी, जि. शहापूर येथून पोलिसांनी 21 नोव्हेंबर, 2023 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास छापेमारी करीत सोनसाखळी चोर मोहमद उर्फ सलमान करीब शहा सैय्यद उर्फ शाफरी (28) रा. दखलन याला अटक केली. त्याच्या चौकशीत त्याचा सहकारी शब्बीर नियामत खान (52 ) रा. इगतपुरी नाशिक याचे नाव समोर आले. त्याला 24 नोव्हेंबर, 2023 रोजी खर्डी गावातून ताब्यात घेतले. 

दोघा चोरांनी गुन्ह्यात वापरलेली 1 लाख 50 हजाराची दुचाकी आणि 4 लाख 20 हजार रुपयांचे 70 ग्रॅम वजनाचे दागिने असा 5 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. कळवा पोलिसांनी धडक कारवाई आणि सीसीटीव्ही  आधारे दोन आरोपीना अटक केली. 

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक

शेअर बाजारातील गुंतवणुकीवर झटपट पैसे कमावून श्रीमंत होण्याची स्वप्ने अनेकजण पाहतात. लोकांच्या याच मानसिकतेचा गैरफायदा घेत फसवणुकीच्या अनेक घटना घडत असतात.  अशाच एका घटनेतील आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे. डोंबिवलीतील अनेकांना गंडा घालणाऱ्या आरोपीला पुण्यात सापळा रचून अटक करण्यात आली. 

डोंबिवली मध्ये शेअर मार्केटमध्ये  गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 10 टक्के फायदा देण्याचे आमिष आरोपीने दाखवले होते. आरोपीने 150 हून अधिक लोकांना 4 कोटी 60 लाख रुपयाचा चुना लावणाऱ्या आरोपीला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विनय वरटी असे या आरोपीचे नाव असून शेअर मार्केटिंग साठी त्याने डोंबिवलीत शेअर मार्केटिंग चे कार्यालय सुरू केले होते. जवळपास 150 हून अधिक नागरिकांचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले. मात्र गुंतवलेल्या पैशांवर व्याज मिळत नसल्याने अनेक गुंतवणूकदारांनी डोंबिवलीतील रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींच्या झेरॉक्स साठी तब्बल 42 हजार रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget